भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी २० मालिका ९ डिसेंबरपासून
पाच सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
धाकड फलंदाजाचं पुनरागमन, हर्षित राणालाही संधी
भारतीय संघात दोन बदल, मॅचविनर फलंदाज बाहेर
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ डिसेंबरपासून टी २० मालिका खेळवण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी आज, बुधवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून मैदानाबाहेर असलेल्या हार्दिक पंड्याचं संघात पुनरागमन झालं आहे. मानेच्या दुखापतीमुळं सध्या संघाबाहेर असलेल्या शुभमन गिलबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो भारतीय चमूत असणार आहे. पण तो खेळणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. त्याच्या फिटनेसवर सर्वकाही अवलंबून असेल. तर या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे.
टी २० मालिकेसाठी भारतीय संघात दोन बदल झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात रिंकू सिंहला स्थान मिळालेलं नाही. तर नितीश कुमार रेड्डीलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांना संधी का देण्यात आली नाही, याबाबतचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ऑलराउंडर हार्दिक पंड्या आशिया कप २०२५ मध्ये खेळताना जायबंदी झाला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. भारतीय संघात तो पुन्हा आला आहे. हार्दिक पंड्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूंत ७७ धावांची तुफानी खेळी केली होती. यात सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.
सूर्यकुमार यादव हा कर्णधार असेल. तर शुभमन गिलकडं उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो या मालिकेत खेळणार का, हा प्रश्न आहे. त्यानंतर सलामीला तडाखेबंद फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा असणार आहे. तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश आहे.
टी २० मालिकेचा पहिला सामना ९ डिसेंबरला कटकमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा टी २० सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ हे चंदीगडला जातील. हा सामना ११ डिसेंबरला होईल. धर्मशालामध्ये १४ डिसेंबरला तिसरा टी २० सामना होईल. या मालिकेतील चौथा टी २० सामना १७ डिसेंबरला लखनऊमध्ये होईल. तर अखेरचा आणि पाचवा सामना १९ डिसेंबरला अहमदाबादमध्ये होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.