team india
team india twitter
क्रीडा | IPL

Team India : … म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हातावर बांधली काळ्या रंगाची पट्टी;जाणुन घ्या कारण

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. हा सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र दोन्ही संघ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांपैकी आहे. या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी हाताला काळी पट्टी बांधली आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या रेल्वे अपघातात २८८ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेक एक हजारांहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात मृत पावलेल्या प्रवाश्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू मैदानावर काळ्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. हा सामना जेव्हा सुरु झाला तेव्हा दोन्ही संघातील खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळलं. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ गेल्या १० वर्षांपासून आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याच्या प्रत्यनात आहे.

एमएस धीनीने २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाला विजय विजय मिळवून दिला होता. त्यानंतर भारतीय संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाहीये. हा सामना जिंकून भारतीय संघाला पराभवाची साखळी तोडण्याची संधी असणार आहे. भारतीय संघाला दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी मिळाली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

Today's Marathi News Live : गोरेगाव दिंडोशी विषबाधा प्रकरण,अनधिकृत खाद्य स्टॉलवर पालिकेकडून धडक कारवाई

SCROLL FOR NEXT