Pm Modi Interview:
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस सातत्याने आरोप करत आहे की, मोदी सरकार निवडणूक जिंकण्यासाठी ईडी, सीबीआय या सारख्या तपास यंत्रणांचा वापर करत आहे. यावरच आता न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी ईडी, सीबीआय आणि ईव्हीएमवर विरोधकांच्या आरोपांना उघडपणे उत्तर दिले आहे.
काँग्रेसवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''2014 आधी सीबीआय आणि ईडी त्यांच्या हातातील बाहुले होते, मग ते निवडणुका कसे हरले.'' ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची भीतीही मोदी यांनी निराधार असल्याचे सांगून एवढ्या मोठ्या देशात महापालिका निवडणूकही निश्चित होऊ शकत नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, विरोधक जगाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून हे लोक इतके निराश झाले आहेत की, ते बहाणे शोधत आहेत. कारण पराभवानंतरही त्यांना लोकांसमोर जावे लागते. त्यामुळे मला वाटते की कदाचित ते हे सर्व बहाणे आधीच शोधत असतील. कदाचित त्यांच्या अंतर्गत रणनीतीचा भाग आहे."
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही पंतप्रधान मोदींनी टीका केली आणि त्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव असल्याचे सांगितले. संपत्तीच्या पुनर्वितरणाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कल्पना शहरी नक्षलची विचारसरणी असल्याचे ते म्हणाले. मोदी म्हणाले, “एक्स-रे म्हणजे प्रत्येक घरावर छापा टाकणे. जर एखाद्या महिलेने मोठ्या धान्याच्या डब्यात सोने लपवले असेल, तर त्याचा एक्स-रे केला जाईल. त्या महिलांचे दागिने जप्त करण्यात येतील. जमीन व मालमत्तेची कागदपत्रे तपासून या सर्व मालमत्तांचे पुनर्वितरण केले जाणार आहे. अशा माओवादी विचारसरणीने जगाला कधीही मदत केलेली नाही. ही पूर्णपणे शहरी नक्षलची विचारसरणी आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.