Richa Ghosh x
Sports

Richa Ghosh : 4 सेंटीमीटरने केला घात! अवघे 6 रन्स शिल्लक असताना हुकलं शतक; Video पाहून तुम्हीही चुकचुकाल

Richa Ghosh Innings : विशाखापट्टणममध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा महिला वनडे वर्ल्डकप २०२५ मधील सामना रंगला आहे. या सामन्यात रिचा घोषचे शतक अवघ्या ६ धावांची हुकले.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरु आहे.

  • भारतीय संघ २५१ धावांवर सर्वबाद झाला.

  • रिचा घोषचे शतक ६ धावांनी हुकले.

IND W Vs SA W : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ मधील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना रंगला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघाने ४९.५ ओव्हर्समध्ये २५१ धावा केल्या. सामन्यात रिचा घोषने जबरदस्त खेळी केली, ती ९४ धावांवर बाद झाली. फक्त ४ सेंटीमीटरने तिचे शतक हुकले. असे असतानाही तिने वर्ल्डकपमध्ये विक्रम प्रस्थापित केला.

दक्षिण आफ्रिकाने टॉस जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत दमदार सुरुवात केली. पण या जोडीनंतर मधल्या फळीतील फलंदाजही लागोपाठ बाद झाले. ८३ धावांवर एकच विकेट पडली होती. पण पुढे अवघ्या १०२ धावांवर भारताचे सहा फलंदाज बाद झाले.

आठव्या क्रमांकावर खेळण्यासाठी रिचा घोष मैदानात उतरली. तिने परिस्थितीनुसार खेळ सुरु ठेवला. तिने ५३ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर तिने चौकार, षटकारांचा मारा करत संघाला २५० धावांच्या पुढे नेले. डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ३ चेंडू शिल्लक असताना ती ९४ धावांवर बाद झाली. षटकार मारत १०० धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना ती बाद झाली.

झेल घेतल्यानंतर रिचाने नो-बॉलसाठी अंपायरकडे अपील केले. त्यांनी तो अपील थर्ड अंपायरकडे पाठवला. हाईट ट्रॅकरच्या रिप्लेमध्ये चेंडू चिन्हापेक्षा फक्त ४ सेंटीमीटरने खाली असल्याचे दिसून आले. यामुळे तिला थर्ड अंपायरने बाद घोषित केले. शतक हुकले असतानाही तिने विश्वविक्रम रचला. महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात ८ व्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना खेळाडूने केलेली सर्वोच्च धावसंख्या या विक्रमाची नोंद रिचा घोषच्या नावावर झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

IND-W vs SA-W: 'हा विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देणारा', महिला संघाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

World Cup 2025: चक दे इंडिया! भारताच्या पोरींनी अखेर करून दाखवलंच; ICC वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच कोरलं नाव

Amanjot Kaur Direct Throw: वाह भाई वाह! अमनजोत कौरचं गजब क्षेत्ररक्षण; धाव चोरणाऱ्या खेळाडूच्या दांड्या केल्या गुल, Video Viral

SCROLL FOR NEXT