team india twitter
Sports

Team India: भारतीय पोरींनी इतिहास रचला! महिला U-19 टी-20 WC मध्ये जे कोणालाच नाही जमलं ते करुन दाखवलं

India W vs England W, Team India Record: भारतीय संघाने महिला अंडर १९ टी-२० वर्ल्डकपच्या फानयलमध्ये भारतीय संघाला पराभूत करुन जेतेपदाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयसीसी महिला अंडर १९ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करुन ९ गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन दाखवली.

पण वैष्णवी शर्मा आणि तृषा गोंगाडी यांच्या कामगिरीचं विशेष कौतुक करावं लागेल. संपूर्ण मालिकेत या दोन्ही खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी अंडर १९ टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दरम्यान भारतीय संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

भारतीय खेळाडूंनी रचला इतिहास

या शानदार विजयासह भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा हा वर्ल्डकप जिंकला, यादरम्यान एकही सामना गमावला नव्हता. यासह आयसीसी महिला अंडर १९ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात एकही सामना न गमावता टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला आहे.

यापूर्वी कुठल्याही संघाला असा कारनामा करता आलेला नाही. मुळात कुठल्याच संघाला वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सर्वच संघांवर भारी पडला.

एकही सामना न गमावता भारताने उंचावली टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी

आयसीसी महिला अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने हा ७ सामने खेळले आणि हे सर्व सामने जिंकले. साखळी फेरीतील सामने सुरु असताना, भारतीय संघाने वेस्टइंडिजला ९ गडी राखून, मलेशियाला १० गडी राखून, श्रीलंकेला ६० धावांनी पराभूत केलं.

त्यानंतर सुपर ६ फेरीत भारतीय संघाचा सामना बांगलादेशविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर स्कॉटलँडला १५० धावांनी आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडला ९ गडी राखून पराभूत केलं.

आता फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघ्या ८३ धावांचं आव्हान होतं. हे आव्हान भारतीय संघाने सहज पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT