harmanpreet kaur twitter
क्रीडा

IND W vs ENG W: हरमनप्रीतला हलगर्जीपणा नडला? पुन्हा एकदा तीच चूक केल्याने गमावली विकेट! पाहा video

Ankush Dhavre

Harmanpreet Kaur Run Out:

मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला आणि इंग्लंडच्या महिला संघात एकमेव कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने ४२८ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शुभा सतीशने ६९ आणि जेमिमा रॉड्रिग्जने ६८ धावांची खेळी केली. या सामन्यात हरमनप्रीत कौरकडेही मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र यावेळीही तिने जुन्या चुकांपासून धडा न घेता, तीच चूक पुन्हा एकदा केली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात हरमनप्रीत कौरला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती. ४९ धावांवर असताना तिने १ धाव पूर्ण केली. मात्र क्रीझच्या अगदी जवळ असताना तिची बॅट फसली. नेमकं त्याचवेळी इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकाने थ्रो मारला आणि ती धावबाद होऊन माघारी परतली. जर तिने हात थोडा पुढे केला असता तरी ती बाद झाली नसती. हरमनप्रीत कौर दुसऱ्यांदा अशा पद्धतीने बाद झाली आहे.

यापूर्वी टी-२० वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यातही ती याच पद्धतीने बाद झाली होती. त्यावेळी ती जोरदार फॉर्ममध्ये होती आणि भारतीय संघ विजय मिळवण्याच्या वाटेवर होता.मात्र तिच्या रनआऊटमुळे भारतीय संघाला ५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात १३३ धावा केल्या होत्या. जेमिमा रॉड्रिग्ज ४३ तर हरमनप्रीत कौर ५२ धावांवर नाबाद होती. भारतीय संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना तिची बॅट क्रिझमध्ये अडकल्याने ती रनआऊट झाली होती.

इंग्लंडचा डाव १३६ धावांवर संपुष्टात..

तसेच या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४२८ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १३६ धावांवर संपुष्टात आला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तिने ५.३ षटकात अवघ्या ७ धावा खर्च केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT