team india yandex
Sports

IND vs ZIM: टीम इंडियाला मोठा धक्का! झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून 3 स्टार खेळाडू बाहेर

Team India Squad For Zimbabwe: भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर भारतीय संघ नव्या टी-२० हंगामासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ टी-२० मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. आता या संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत. वर्ल्डकप संघात असलेल्या संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेच्या जागी हर्षित राणा, जितेश शर्मा आणि साई सुदर्शन यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना झाला आहे. दरम्यान वर्ल्डकप संघाचा भाग असलेले शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन हे थेट तिसऱ्या टी-२० दरम्यान भारतीय संघासोबत जोडले जाणार आहेत.

नुकताच भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. मात्र अजूनही संघातील खेळाडू मायदेशी परतलेले नाहीत. वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हे तिन्ही खेळाडू उशीराने झिम्बाब्वेमध्ये दाखल होणार आहेत.

या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर मालिकेतील पहिला सामना ६ जुलै रोजी रंगणार आहे. त्यानंतर मालिकतील दुसरा सामना ७ जुलै रोजी रंगणार आहे. तिसरा सामना १० जुलै, मालिकेतील चौथा सामना १३ जुलै आणि मालिकेतील पाचवा सामना ५ जुलै रोजी रंगणार आहे.

मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा , आवेश खान, खलील अहमद.

असा आहे झिम्बाब्वेचा संघ:

रजा सिकंदर (कर्णधार), अकरम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जॉनथन, चतारा टेंडाई, जोंगवे ल्यूक, काइया इनोसेंट, मडेंडे क्लाइव, मसाकाद्जा वेलिंगटन, मावुता ब्रँडन, मुजाराबानी ब्लेसिंग, मायर्स डायन, नकवी अंतुम, नगारवा रिचर्ड, शुम्बा मिल्टन, मधेवेरे वेस्ली, मारुमानी तदीवानाशे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

अक्षय नागलकर प्रकरणात मोठी अपडेट; 8 मित्रांनीच रचला मित्राच्या हत्येचा कट|VIDEO

Maharashtra Live News Update : रवींद्र धंगेकर यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटानं डाव टाकला; महायुतीत फुटीची शक्यता

SCROLL FOR NEXT