Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

Congress Former Minister Surupsingh Naik Passes Away: ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री आणि खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेस आणि नंदुरबारच्या राजकारणात शोककळा पसरलीय. नंदुरबारमध्ये त्यांनी युवक आणि शेतकऱ्यांसाठी उल्लेखनिय काम केलंय.
Congress Former Minister Surupsingh Naik Passes Away
Senior Congress leader and former minister Surupsingh Naik, who passed away at the age of 88.saam tv
Published On
Summary
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

  • वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • काँग्रेस पक्षात आणि राज्याच्या राजकारणात शोककळा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे निधन झालंय. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनाच्या बातमीने काँग्रेससह नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक हे १९८१ ते २०१९ राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. इंदिरा गांधी आणि गांधी परिवाराच्या ते नीकटवर्तीय होते. विश्वासू सहकारी म्हणून नाईक यांची ओळख होती.

आणीबाणी नंतर सुरुपसिंग नाईक यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळगळात पोहचवत पक्षाला मजबूत केलं होतं इतकेच नाही, तर त्यांनी आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. राज्यात समाजकार्य करता यावे यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत राज्यातील राजकारणात सक्रीय झाले होते.

Congress Former Minister Surupsingh Naik Passes Away
kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेसाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; यंदा केली नव्या टॅगलाईनची घोषणा

माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे राजकीय कार्य

नवापूर सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारलं. आदिवासी युवकांना शिक्षणाचा प्रवाहात आणलं

आदिवासीबहुल भागात एमआयडीसीची स्थापना करून रोजगाराच्या संधी उपलब्ध

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

19 72 ते 1981 मध्ये त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदारकी निभावली होती.

1981 ला खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला होता.

1981 मध्ये त्यांनी आदिवासी विकास समाज कल्याण मंत्रीपद भुषवले होते.

1981 ते 82 मध्ये त्यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची सदस्यता निभावली होती.

1982 नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांची बिनविरोध विधानसभेवर निवड झाली होती.

Congress Former Minister Surupsingh Naik Passes Away
Thackeray Brothers : 'ठाकरें'च्या एकजुटीनं समीकरणं बदलणार! महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? ६ मुद्द्यांत समजून घ्या

1982 ते 2009 सलग महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य

1982 पासून 2009 पर्यंत आदिवासी विकास विभाग वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यटन परिवहन विभागाचे मंत्रीपदही त्यांनी भूषविले होते.

2009च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

2014 विधानसभा निवडणुकीत पुन्हा नवापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी

2019 निवडणुकीत राजकारणातून बाजूला होत मुलगा शिरीष कुमार नाईक यांना नवापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com