Rohit Sharma Saam TV
क्रीडा

IND vs WI: पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितसोबत 'या' खेळाडूला संधी

वृत्तसंस्था

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI Series) यांच्यातील एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी तीन भारतीय खेळाडू आणि एका स्टँडबाय खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी प्रथमच कर्णधार बनलेल्या रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याच्यासोबतच्या पहिल्या सामन्यात ईशान किशन सलामीवीर असणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत आपला 1000 वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 1000 एकदिवसीय सामने खेळणारा भारत हा जगातील पहिला संघ असणार आहे. (Captain Rohit Sharma Press Conference)

* टी-20 विश्वचषकाच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला की, आम्हाला कोणत्याही विशेष बदलांची गरज नाही. केएल राहुलच्या विचाराशी सहमत नाही.

* रोहित शर्मा म्हणाला की, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या जोडीवर लक्ष ठेवणार आहोत.

* बायो-बबल आणि कोविड-19 च्या प्रश्नावर रोहित म्हणतो की, कोरोनाची लागण झालेले तिन्ही खेळाडू बरे होत आहेत.

* विराट कोहलीबद्दल विचारले असता, रोहित म्हणला कोहलीला माहित आहे की त्याला स्वतःसाठी काय हवे आहे. त्याने जिथून खेळ सोडला तिथून मी खेळ सुरू करणार आहे.

* सलामीच्या जोडीबाबत रोहितला विचारले असता, पहिल्या वनडेत ईशान किशन माझ्यासोबत डावाची सुरुवात करणार आहे, असे रोहितने सांगितले.

* कसोटी कर्णधारपदाबद्दल रोहित शर्माला विचारले असता, तो म्हणाला की, त्याला आपले सर्व लक्ष आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेवर केंद्रित करायचे आहे.

* फिनिशरच्या भूमिकेबद्दल बोलताना, तो म्हणाला की एमएस धोनीपासून त्या भूमिकेसाठी हार्दिक पांड्या होता, परंतु हार्दिकनंतर त्याच्या जागी कोणताही योग्य पर्याय नाही.

T-20 वर्ल्ड कपसाठी काय योजना आहे?

संघात जास्त बदल करण्याची गरज नाही. फक्त वेगवेगळ्या परिस्थीत जुळवून घेण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही चांगले एकदिवसीय क्रिकेट खेळलो, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवातून आम्हाला धडा घेण्याची गरज आहे. सर्व खेळाडूंनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : मनसे नेते प्रकाश महाजन यांचं तहसील कार्यालयासमोर उपोषण

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT