Sports

IND vs WI: स्मृती मंधानाचे शतक हुकलं; पण टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

IND vs WI: वडोदरा येथील नवीन स्टेडियममध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला. येथे टीम इंडियाने दमदार विजय मिळवला.

Bharat Jadhav

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाने वनडे मालिकेलाही त्याच पद्धतीने सुरुवात केली. वडोदराच्या नवीन स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या टीमने वेस्ट इंडिजचा 211 धावांनी एकतर्फी पराभव केला.

उपकर्णधार स्मृती मंधानाने सलग चौथ्या डावात ५० हून अधिक धावा केल्या. याच जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून ३१४ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरासाठी मैदानाच उतरलेला वेस्ट इंडिजचा महिला संघाने लवकरच मैदान सोडले. अवघ्या १०३ धावांवर वेस्ट इंडिजचा संघ बाद झाला.

टीम इंडियाने रविवारी 22 डिसेंबर रोजी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात स्फोटक सुरुवात केली.या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी युवा फलंदाज प्रतिका रावल ही मंधानासह सलामीला आली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 110 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. प्रतिका रावल हिने ४० धावा केल्या. तर मंधानाने ९० धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्या आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत सलग 3 अर्धशतकं झळकावणाऱ्या मंधानाने पुन्हा एकदा 50 चा टप्पा पार केला. मंधाना मात्र तिचे शतक पूर्ण करू शकली नाही आणि 91 धावांवर बाद झाली. स्मृती बाद झाल्यानंतर ती तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत चौथ्यांदा 'नर्व्हस नाइन्टीज'वर आली. कर्णधार हरमनप्रीत कौर (34), रिचा घोष (26) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (31) यांनी मधल्या फळीत लहान पण वेगवान खेळी खेळल्या.

ज्याच्या जोरावर टीम इंडिया मोठी धावसंख्या गाठू शकली. त्यानंतर गोलंदाजीतही भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. 20 वर्षीय फिरकीपटू झैदा जेम्सने वेस्ट इंडिजसाठी अप्रतिम गोलंदाजी केली आणि 8 षटकात 45 धावा देऊन 5 बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT