Sanju Samson latest news Saam TV Marathi News
Sports

Sanju Samson : गौतम गंभीरची गुगली! संजू सॅमसन नाही तर 'हा' खेळाडू आहे विजयाचा खरा शिल्पकार

Gautam Gambhir reaction after India win : वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या विजयात संजू सॅमसनच्या ९७ धावांइतकाच शिवम दुबेच्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीचा वाटा असल्याचे गौतम गंभीर यांनी म्हटले. संघाच्या सांघिक प्रयत्नांमुळेच विजय शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

Sanju Samson latest news : संजू सॅमसनच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने सेमीफायनलचे तिकिट मिळवले आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनर मैदानावर विडिंजविरोधात संजूने ९७ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीनंतर संजू सॅमसन याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांनी संजू सॅमसनच्या या दणकेबाज फलंदाजीचे कौतुक केलेच. संजू सॅमसन याला ९७ धावांच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. गौतम गंभीर यानं संजू सॅमसन याचं कौतुक करताना शिवम दुबे याच्या योगदानावरही भाष्य करत त्याच्यामुळे विजय शक्य झाल्याचे म्हटले. गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?

गौतमनं केलं दुबेचे कौतुक, म्हणाला

वेस्ट इंडिजवर विजय मिळवल्यानंतर गौतम गंभीर यानं सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवल्याचे म्हटले. संजू सॅमसन याची खेळी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाच्या त्या छोट्या छोट्या खेळी असल्याचे तो म्हणाला. गौतम गंभीर याने शिवम दुबे याच्या १९ व्या षटकातील दोन चौकारांचा उल्लेख केला. दुबे याच्या त्या दोन चौकारांमुळे संजू सॅमसन याच्यावरील दबाव खूप कमी झाला. क्रिकेटमध्ये सांघिक खेळाला खूप महत्त्व असल्याचे गंभीर म्हणाला.

हार्दिक पंड्या एका डॉट बॉलनंतर बाद झाला होता. त्यामुळे १० चेंडूत १७ धावांची आवश्यकता होती. पण दुबेने मैदानात येताच आक्रमक फटेकाबाजी करत सामना भारताच्या बाजूने वळवला. गंभीरने या प्रयत्नाचे कौतुक केले आणि संघाच्या यशासाठी प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वाचे असल्याचे म्हणाला. शिवम दुबे याने खास खेळी केली. त्या छोट्या योगदानामुळे सामने जिंकण्यास मदत होते. त्याला आपण नाकारू शकत माही. मोठे योगदान नेहमीच हेडलाइन बनतात. पण लहान योगदन संघाला विजयाच्या जवळ नेहतात.

शिवम दुबेचे १९ व्या षटकातील २ चौकार संजू सॅमसनच्या ९७ धावांइतकेच महत्त्वाचे आहेत. हा एक सांघिक खेळ आहे आणि हा नेहमीच सांघिक खेळ राहील. म्हणून, हे दोन चौकार संजूच्या डावाइतकेच महत्त्वाचे आहेत. जर आपण आज रात्री कामगिरी केली नसती तर आपण संजूबद्दल बोललो नसतो, असे गंभीरने पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, गौतम गंभीरने संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या खेळीचे तोंडभरून कौतुक केले. सॅमसनने दबावाखाली सामना जिंकून दिल्याचे गंभीर म्हणाला. संजू सॅमसन हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, असेही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 : एक नव्हे 'बिग बॉस'मध्ये थेट ३ वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री, घराचे तापमान वाढणार

Maharashtra Live News Update : नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीवरून नवा वाद

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या, पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडणार, धक्कादायक कारण आले समोर

Iran-Israel War: युद्धादरम्यान PM मोदींचा थेट नेतान्याहूंना फोन, नेमकी काय चर्चा झाली? भारतात मोठी बैठक

Hairstyles For Holi Party: होळी खेळताना रंगापासून वाचवण्यासाठी केस कसे बांधायचे?

SCROLL FOR NEXT