ind vs wi 3rd t20 Match Result hardik pandya not allow to tilak varma complete his fifty Saam TV
Sports

Hardik Pandya: धोनी-विराटला आदर्श मानतोस अन् असं करतोस; हार्दिकच्या त्या कृतीवर नेटकरी भडकले

IND vs WI 3rd T-20 Hardik Pandya: कर्णधार हार्दिक पांड्याने धोनी स्टाईलने सिक्सर मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मात्र, या विजयानंतरही त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

Satish Daud

IND vs WI 3rd T-20 Hardik Pandya: सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक, तिलक वर्माची संयमी खेळी आणि कुलदीप यादवच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार कामगिरी करत विजय मिळवला आणि मालिकेतील आपलं आव्हान कायम राखलं.

कर्णधार हार्दिक पांड्याने धोनी स्टाईलने सिक्सर मारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मात्र, या विजयानंतरही त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सामन्यानंतर नेटकऱ्यांनी हार्दिकला प्रचंड ट्रोल केलं. तू महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना आर्दश मानतोस अन् असं करतोस... अशी टीका अनेकांनी त्याच्यावर केली.

तिसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. टी-20 सामन्यात पदार्पण करणारा यशस्वी जायस्वाल पहिल्याच षटकात माघारी परतला.

त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमारने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र, अल्झारी जोसेफने शुभमन गिलला बाद करत टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. गिल केवळ 6 धावा काढून बाद झाला.

त्यानंतर फलंजासाठी आलेला युवा फलंदाज तिलक वर्माने सूर्यकुमारच्या साथीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट्साठी 87 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादव शतकी खेळी करणार असं वाटत असताना टीम इंडियाला तिसरा धक्का बसला.

अल्झारी जोसेफला मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्या बाद झाला. सूर्यकुमारने 44 चेंडूत 83 धावा कुटल्या. यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या मैदानावर उतरला.

त्याने शेवटच्या काही षटकात फटकेबाजी केली. दरम्यान, तिलक वर्माला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एक धाव हवी होती. त्याचवेळी हार्दिक स्ट्राईकवर होता. त्याने षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्यामुळे युवा तिलकचे अर्धशतक होता-होता राहून गेले.

या सामन्यानंतर नेटकऱ्यांनी कर्णधार हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल केलं. विजयासाठी 2 धावांची गरज होती, तू एक धाव घेऊन तिलकला स्ट्राईक देऊ शकत होता. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना आर्दश मानतोस अन् असं करतोस... अशी टीका अनेकांनी त्याच्यावर केली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

SCROLL FOR NEXT