ind vs wi 3rd t20i saam tv
क्रीडा

IND vs WI 3rd T20 Highlights: सूर्याच्या वादळाचा विंडीजला तडाखा; तिसरा सामना जिंकत टीम इंडियाचं दमदार कमबॅक

Ankush Dhavre

India vs West Indies 3rd T20I:

भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पार पडला. गयानाच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

यासह भारतीय संघाने या मालिकेत २-१ ने दमदार कमबॅक केले आहे. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो ठरला आहे.

गयानाच्या मैदानावर सूर्यकुमार यादवची कमाल..

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटक अखेर ५ गडी बाद १५९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता.

या धावांचा पाठलाग करताना त्याने वेस्टइंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने चौफेर फटकेबाजी करत ४४ चेंडूंमध्ये ८३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले.

विजयासाठी १६० धावांचे आव्हान..

वेस्टइंडीजचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. वेस्टइंडीजकडून प्रथम फलंदाजी करताना ब्रेंडन किंगने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली होती. तर रोमेन पॉवेलने नाबाद ४० धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर वेस्टइंडीजने २० षटक अखेर ५ गडी बाद १५९ धावा केल्या होत्या. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने ४ षटक गोलंदाजी करत २८ धावा खर्च करत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अक्षर पटेल आणि मुकेश कुमारने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. (Latest sports updates)

भारतीय फलंदाज ठरले हिट...

सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं होतं. तिलक वर्माने या सामन्यातही नाबाद ४९ धावांची खेळी केली. तर कर्णधार हार्दिक पंड्याने नाबाद २० धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यासह भारतीय संघाने या मालिकेत २-१ ने दमदार कमबॅक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT