IND vs WI 3rd T20I: टीम इंडियासमोर विजयासाठी १६० धावांचं लक्ष्य; कुलदीपच्या फिरकीने केली कमाल

IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर १६० धावांचं लक्ष्य दिलं आहे.
IND vs WI 3rd T20I
IND vs WI 3rd T20ISaam tv
Published On

IND vs WI 3rd T20I: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरा टी-२- सामना गुयाना येथील प्रोविडेंस स्टेडियमवर सुरू आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ०-२ ने मागे आहे. वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर १६० धावांचं लक्ष्य दिलं आहे. या सामन्यात गोलंदाज कुलदीपच्या फिरकीने कमाल करत वेस्ट इंडिजचे तीन गडी बाद केले. (Latest Marathi News)

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पहिला पाच षटकात 32 धावा कुटल्या. अक्षर पटेलने पाचव्या षटकात केवळ २ धावा दिल्या. त्यानंतर अक्षर पटेलने वेस्ट इंडिजचा पहिला गडी बाद केला.

IND vs WI 3rd T20I
World Cup 2023 Timetable: वर्ल्डकपबाबत मोठी अपडेट आली समोर! लवकरच होणार सुधारीत वेळापकत्रकाची घोषणा

वेस्ट इंडिजने १० व्या षटकात ७० धावा ठोकल्या. फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने ४ षटकात अवघ्या २४ धावा दिल्या. कुलदीपने ११ व्या षटकात दुसरा गडी बाद केला. चार्ल्सने १४ चेंडूत १२ धावा केल्या.

चार्ल्स बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने आक्रमक खेळ दाखवला. पूरने १३ व्या षटकात चौकार आणि षटकार लगावले. १५ व्या षटकात कुलदीपने चकवा देत निकोलस पूरनला बाद केले. तर १८ व्या षटकात शिमरोन हेटमायरला बाद केले. वेस्ट इंडिजने २० षटकात १५९ धावा केल्या. कर्णधार पॉवेलने ४० धावा आणि शेफर्ड २ धावा करत नाबाद राहिला.

IND vs WI 3rd T20I
IND vs WI: 'IPL सुरु झाल्यानंतर एकही वर्ल्डकप..', टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू भडकले

भारतीय संघ: शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार सिंह

वेस्ट इंडिजचा संघ : ब्रॅडन किंग, काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोवमॅन पॉवेल (कर्णधार), शिमरोन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, रोस्टन चेज, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ओबेड मैककॉय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com