Hardik Pandya Statement After IND vs WI 3rd ODI saam tv
क्रीडा

IND vs WI 3rd ODI: मालिका जिंकताच कर्णधार पंड्याचा पारा चढला! थेट बोर्डालाच सुनावले खडेबोल

Hardik Pandya Statement After India vs West India 3rd ODI: या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या नाराजी व्यक्त करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Criticized West Indies Cricket Board:

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या सामन्यात भारतीय संघाने २०० धावांनी विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

तर दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीज संघाने कमबॅक करत ६ गडी राखून विजय मिळवला होता. आता मालिकेतील अंतिम सामना जिंकून भारतीय संघाने मालिका २-१ ने खिशात घातली आहे. मात्र या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या नाराजी व्यक्त करताना दिसून आला आहे.

ही मालिका झाल्यानंतर बोलताना कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, 'आम्ही आतापर्यंत ज्या ज्या मैदानांवर खेळलो आहे, त्यामध्ये हे सर्वोत्तम मैदानांपैकी एक होते. पुढच्या वेळी जेव्हा परत वेस्टइंडीज दौऱ्यावर येऊ त्यावेळी आणखी सुधारणा केली जाऊ शकते. मागच्या वेळी जेव्हा आम्ही इथे आलो होतो, त्यावेळी देखील आम्हाला अडचणींचा सामना करावा लागला होता. मला असं वाटतं की,वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डने याची दखल घ्यायला हवी.' (Latest sports updates)

भारतीय संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने ५ गडी बाद ३५१ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार मारले.

तर ईशान किशनने ७७ धावा केल्या. या खेळी दरम्यान ईशान किशनने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. तर आऊट ऑफ फॉर्म असलेला हार्दिक पंड्या देखील या सामन्यात फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले आहे.

तो नाबाद ५२ धावांची खेळी करत माघारी परतला.भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंजडीजला अवघ्या १५१ धावा करता आल्या. या एकतर्फी सामन्यात भारतीय संघाने २०० धावांनी विजय मिळवला. यासह वनडे मालिकेत २-१ ने विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT