IND vs WI 2nd Test Match Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (२० जुलै) सुरू झाला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात दमदार झाली. रोहित-यशस्वीच्या जोडीने शतकी भागीदारी केली. पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी कमबॅक करत टीम इंडियाला दडपण आणलं.
एकापाठोपाठ एक ठराविक अंतराने सलग ४ धक्के बसल्याने टीम इंडिया बॅकफूटवर आली होती. मात्र, विराट-जडेजाच्या जोडीने पहिल्या दिवशी भारताला सुस्थितीत नेलं. वेस्ट इंडिजने केवळ या फॉरमॅटमध्येच नव्हे तर सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी आवश्यक असलेल्या लढतीची झलक दाखवली.
दुसऱ्या कसोटीत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्याच दिवशी ४ बाद २८८ धावा केल्या. रोहित शर्माने ८० धावा तर यशस्वी जैस्वालने ५७ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली.
दोघेही मोठी खेळी करणार असे वाटत असताना जेसन होल्डरने यशस्वीला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणेला वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी झटपट माघारी पाठवलं. त्यातच रोहित शर्मा बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था ४ बाद १८२ अशी झाली होती.
मात्र, त्यानंतर फलंदाजासाठी मैदानात उतरलेल्या रवींद्र जडेजाने विराट कोहलीची चांगली साथ दिली. दोघांनी मिळून शतकी भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली. ८७ धावा काढून नाबाद होता. तर रवींद्र जडेजाने ३६ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने १३ षटकात ३० धावा देत एक विकेट घेतली. तर वॅरिकनने २५ षटकांत ५५ धावा देत एक विकेट घेतली. गॅब्रिएलने १२ षटकांत ५० धावा देत एक विकेट घेतली. याशिवाय केमार रोचने १३ षटकांत ६४ धावा देत एक विकेट घेतली. याशिवाय इतरा एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.