virat kohli  saam tv
Sports

IND VS WI: संघाबाहेर असूनही किंग कोहली का होतोय ट्रेंड? टीम इंडियाच्या पराभवाचं अन् विराटचं काय आहे कनेक्शन; जाणून घ्या

Virat Kohli: भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांना विराट कोहलीची आठवण येऊ लागली आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Record In T20I: भविष्याच्या संघबांधणीसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. वेस्टइंडीज दौऱ्यावर सुरू असलेल्या टी-२० मालिकेसाठी देखील युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे.

सलग दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता निवडकर्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरूवात झाली आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांना विराट कोहलीची आठवण येऊ लागली आहे.

विराट कोहली हा भारतीय संघातील टॉप ऑर्डरमधील प्रमुख फलंदाजांपैकी आहे. मात्र विराटच्या अनुपस्थितीत ईशान किशन, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव हे टॉप ऑर्डरचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. विराट कोहली हा टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना भारतीय संघाला चांगली सुरूवात करून देतो. तसेच आवश्यकता असताना तो शेवटपर्यंत टिकून संघाला विजय देखील मिळवून देतो.

गेल्या १५ इनिंगमध्ये काय घडलं?

वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विराट कोहलीला गेल्या काही टी-२० सामन्यांमध्ये विश्रांती दिली गेली होती. त्यामुळे इतर फलंदाजांना त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली होती. गेल्या १५ सामन्यांमध्ये इतर फलंदाजांनी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना २४.२८ च्या सरासरीने ३४० धावा केल्या आहेत.

तर एकट्या विराट कोहलीने या क्रमांकावर खेळताना ५७.८० च्या सरासरीने ५८७ धावा ठोकल्या आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, विराट कोहलीने या क्रमाकांवर खेळताना दुपटीने धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

७ ऑगस्ट हा दिवस विराट कोहलीसाठी खास का आहे?

संघाबाहेर असतानाही विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल होतोय. यामागचं कारण म्हणजे, आजच्याच दिवशी विराट कोहलीला टी-२० कारकिर्दीतील पहिला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. ७ ऑगस्ट २०१२ रोजी श्रीलंकेविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली होती. या एकमात्र टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याने ६८ धावांची खेळी केली होती.

टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहालीचा बोलबाला..

विराट कोहलीने ११ वर्षांपूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकावले होते. वर्तमान क्रिकेटमध्ये तो या फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे.आतापर्यंत त्याने एकूण ५२.७३ च्या सरासरीने ४००८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३८ अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात

AAP MLA : आप आमदाराला कोर्टाचा दणका; तरुणीला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी ठरवलं दोषी; फैसला कधी?

घरात मृत व्यक्तीचा फोटो कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या

Himachal Flood : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, ३७० जणांचा मृत्यू, ४३४ जण जखमी आणि ६१५ रस्ते बंद

Banjara Community : आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा

SCROLL FOR NEXT