IND vs USA T20 World Cup 2024 
Sports

IND vs USA T20 World Cup: भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे अमेरिका भेदरली; टीम इंडियाला १११ धावांचे आव्हान

IND vs USA T20 World Cup 2024: भारत आणि अमेरिका यांच्यात टी-२० विश्वचषकाचा महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये आपले स्थान निश्चित करेल.

Bharat Jadhav

T20 विश्वचषक 2024 च्या 25 व्या सामन्यात भारताचा सामना अमेरिकेशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर अमेरिकेची फलंदाजी ढेपाळली. भारतीय गोलंदाजांनी माऱ्यापुढे अमेरिकेला मोठी धाव संख्या उभारता आली नाही. अमेरिकेच्या संघाने २० षटकात ८ विकेट गमावत ११० धावा केल्यात.

अमेरिकेकडून नितीशकुमारने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय स्टीव्हन टेलरने २४ धावा केल्या. भारताकडून या सामन्यात अर्शदीप सिंगने ४ षटकात ९ धावा देत ४ बळी घेतले. ही २० विश्वचषकातील भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. हार्दिक पंड्याने ४ षटकात १४ धावा देत २ बळी घेतले. अर्शदीप सिंगने सामन्याच्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली.

IND vs USA प्लेइंग इलेव्हन

इंडिया प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

अमेरिका प्लेइंग इलेव्हन: स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), आरोन जोन्स (क), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT