Axar Patel Saam TV
Sports

IND vs SL: दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, कुलदीपच्या जागी अक्सर...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची (IND vs SL Second Test Match) घोषणा केली.

वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची (IND vs SL Second Test Match) घोषणा केली. संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. कुलदीप यादवच्या जागी अक्षर पटेलचा (Axar Patel) संधी देण्यात आली आहे. अक्षर झालेल्या दुखापतीतून सावरत होता ज्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका दौरा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. तोही नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

बीसीसीआयने (BCCI) दिली माहिती

मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकात, बीसीसीआयने सांगितले की, "भारतीय संघाच्या निवड समितीने 12-16 मार्च दरम्यान बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या पेटीएम कसोटीसाठी भारताच्या संघात अक्षर पटेलचा समावेश केला आहे. या अष्टपैलू खेळाडूने संघात पुनरागमण केले आहे आणि त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मंजुरी दिली आहे. हा सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव , मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), अक्षर पटेल.

भारताने श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत जिंकली. मात्र बुधवारपर्यंत संघ मोहालीतच राहणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ बंगळुरूला रवाना होतील. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 13 मार्चपासून येथे खेळवला जाणार आहे. हा सामना डे-नाईट असणार आहे. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने इतर फलंदाजी प्रशिक्षक अपूर्व देसाई, प्रशिक्षक आनंद दाते आणि फिजिओ पार्थो यांनाही सोडले आहे. साईराज बहुलेला संघात कायम ठेवण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT