IND Vs Sl Asia Cup 2024 Saam Digital
Sports

IND Vs Sl Asia Cup 2024 : श्रीलंकेने रचला इतिहास, भारताला हरवून पहिल्यांदा पटकावलं आशिया कपचं विजेतेपद

Shri Lanka Won Asia Cup 2024 : श्रीलंकेने भारताला नमवत क्रिकेट इतिहासात प्रथमच महिला आशिया कपचं विजेतेपद पटकावलं आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे.

Sandeep Gawade

महिला आशिया चषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका संघांमध्ये रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मोठी चुरस पहायला मिळाली. पण शेवटी श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघाला मात दिली. श्रीलंकेने क्रिकेट इतिहासात प्रथमच महिला आशिया कपचे विजेतेपद पटकावलं आहे. श्रीलंका आशिया चषक जिंकणारा भारत आणि बांगलादेशनंतरचा तिसरा महिला संघ बनला आहे.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सलामीवीर शेफाली वर्माला 16 धावांत माघारी परतली. त्यांनंतर स्मृती मानधनाने चांगली फलंदाजी केली असली तरी, स्ट्राईट रेट खूपच कमी राहिला. तीने 47 चेंडूत 10 चौकार ठोकत 60 धावा केल्या. रिचा घोषचाही दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तिने अवघ्या 14 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावांचं योगदान दिलं. जेमिमाह रॉड्रिग्जनेही 16 चेंडूत 29 धावांचं योगदान दिले. त्यामुळे टीम इंडियान 20 षटकांत 6 विकेट गमावून 165 धावांच लक्ष्य गाठता आलं.

प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या 166 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. सुरुवातीला श्रीलंकेने 7 धावांवर पहिली विकेट गमावली. मात्र त्यांची दुसरी विकेट 94 धावांवर पडली. चमारी अटापट्टूने पुन्हा एकदा श्रीलंकेसाठी दमदार खेळी केली. चमारी अटापट्टूने 43 चेंडूत 61 धावा केल्या. ज्यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. हर्षिता समरविक्रमानेही अप्रतिम फलंदाजी केली. हर्षितानेही अर्धशतक झळकावलं, 51 चेंडूत 69 धावा करत संघाला विजयापर्यंत पोहोचवलं.

महिला आशिया कपची ही 9वी टुर्नामेंट होती. या स्पर्धेतील फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. याआधी भारताने 8 पैकी 7 वेळा आशिया कप विजेतेपद पटकावलं आहे. 2018 मध्ये बांगलादेशने फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केला होता. यानंतर ही दुसरी वेळ आहे टीम इंडिया आशिया कप विजेतेपदापर्यंत पोहोचता आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT