IND vs SL 2nd T20 
Sports

IND vs SL 2nd T20: टीम इंडियासमोर १६२ धावांचे आव्हान; कुशल परेराचं अर्धशतक

IND vs SL 2nd T20:भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले येथे खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून यजमान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिला सामना जिंकून भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Bharat Jadhav

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले येथे होत आहे. या सामन्यात टीम इंडिया नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने यजमान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकात ९ गडी गमावत १६१ धावा केल्या. भारताला विजयासाठी १६२ धावा कराव्या लागणार आहेत.

टी२० मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकलाय. दरम्यान भारताने या सामन्यात एक बदल केलाय. मानेच्या दुखण्यामुळे उपकर्णधार शुबमन गिलला बाहेर बसवण्यात आले आहे. त्याच्या जागेवर संजू सॅमसनला संघात संधी देण्यात आलीय.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकात कुसल मेंडिस अवघ्या १० धावांमध्ये तंबूत परतला. यानंतर पथुम निसांका २४ चेंडूत ३२ धावा यात ५ चौकाराचा समावेश आहे. परेरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. परेराने कामिंदू मेंडिससोबत तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली.

भारताचा अष्टपैलू गोलंदाज हार्दिक पंड्याने या दोघांची भागीदारी तोडली. हार्दिकने दोघांना बाद केलं. श्रीलंकेने केवळ ३१ धावा जोडून शेवटचे ६ विकेट गमावले. कर्णधार चारिथ असलंकाने १४ धावांचे योगदान दिले. दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांना खाते सुद्धा उघडता आले नाही.

टी२० मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकलाय. दरम्यान भारताने या सामन्यात एक बदल केलाय. मानेच्या दुखण्यामुळे उपकर्णधार शुबमन गिलला बाहेर बसवण्यात आले आहे. त्याच्या जागेवर संजू सॅमसनला संघात संधी देण्यात आलीय.

भारताचे प्लेइंग इलेव्हन:

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन :

चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT