IND vs SL 2nd ODI Saam TV
Sports

IND vs SL 2nd ODI : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; सूर्यकुमार, इशानला मिळणार संधी? कशी असेल प्लेईंग ११

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे.

Satish Daud

India vs Sri Lanka, ODI : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. कोलकत्त्याच्या ईडन गार्डनवर हा सामना होईल. पहिल्या सामन्यांत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. तर दुसरीकडे श्रीलंका सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Sports News)

कोण कुणावर भारी?

भारत आणि श्रीलंका संघात आतापर्यंत 163 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघ श्रीलंकेवर वरचढ ठरला आहे. भारताने 163 पैकी 94 सामन्यात विजय मिळवला असून श्रीलंकेने 57 सामन्यांमध्ये भारताचा पराभव केला आहे. इतर 11 सामने अनिर्णित राहिले असून 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?

तसं पाहता मालिकेत विजयी आघाडी घेतलेला संघ आपल्या प्लेईंग 11 मध्ये कुठलाही बदल करत नाही. मात्र, पहिल्या एकदिवसीय सामन्यांत सलामीवर फलंदाज इशान किशनच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली. टी-20 मध्ये भन्नाट फॉर्म दाखवलेल्या सूर्यकुमार यादवलाही संघात जागा मिळाली नाही.

रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमी नाराज झाले होते. त्यांनी या निर्णयावर टीका केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलच्या जागी इशान किशन आणि केएल राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळेल का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT