team india X/BCCI
Sports

IND vs SA,2nd ODI: भारत-द.आफ्रिका दुसऱ्या वनडेची वेळ बदलणार! वाचा कुठे,कधी अन् किती वाजता रंगणार सामना?

India vs South Africa ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड देत ८ गडी राखून विजय मिळवला.

Ankush Dhavre

IND vs SA 2nd ODI Match Timings: 

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड देत ८ गडी राखून विजय मिळवला.

या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर १-० ची आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा वनडे सामना ग्केबरहातील सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनूसार दुपारी १:३० वाजता सुरु झाला होता.

तर दुसरा आणि तिसरा सामना भारतीय वेळेनूसार ४:३० वाजता सुरु होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ या मैदानावर सहाव्यांदा आमने सामने येणार आहे. गेल्या ५ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर भारताला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर ४ सामन्यांमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे.

भारत- दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना कधी आहे?

हा सामना १९ डिसेंबर रोजी खेळला जाईल.

भारत- दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना कुठे खेळला जाईल?

हा सामना ग्केबरहातील सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर खेळला जाईल.

भारत- दक्षिण आफ्रिका दूसरा वनडे सामना किती वाजता सुरु होईल?

हा सामना भारतीय वेळेनूसार संध्याकाळी ४:३० वाजता सुरु होईल.

इथे पाहता येईल लाईव्ह टेलिकास्ट

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या लाईव्ह सामन्याचे प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार आणि वेबसाईटवर पाहता येईल. (Latest sports updates)

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, रजत पाटीदार, साई सुदर्शन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग , कुलदीप यादव, मुकेश कुमार, दीपक चाहर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

Celebrity Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोडला संसार; 23 महिन्यांनी घेतला काडीमोड

Maharashtra Elections Result Live Update: रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा पराभव

ऐनवेळी प्रभाग बदलला आणि अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या माजी महापौराचा दणदणीत विजय|VIDEO

Stomach cancer: पोटाचा कॅन्सर झाल्यावर शरीरात कोणते बदल दिसून येतात?

SCROLL FOR NEXT