Rohit sharma twitter
Sports

IND vs SA, Final: कर्णधार असावा तर असा! रोहितने घेतलेल्या या 3 मोठ्या निर्णयांनी टीम इंडियाला बनवलं चॅम्पियन

Rohit Sharma Crucial Decisions In IND vs SA Final: ज्यावेळी भारतीय संघ सामन्यात बॅकफूटवर होता. त्यावेळी रोहितने ३ महत्वाचे निर्णय घेत भारतीय संघाला चॅम्पियन बनवलं.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना हा एका रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हता. कधी इकडे तर कधी तिकडे झुकत असलेल्या शेवटी भारतीय संघाने बाजी मारली आणि दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान हातातून निसटून जात असलेल्या सामन्यात रोहितने ३ महत्त्वाचे निर्णय घेतले आणि भारतीय संघाने सामना जिंकला. कोणते आहेत ते निर्णय? जाणून घ्या.

१) अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय

या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली. मात्र रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहित पाठोपाठ रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादवनेही पॅव्हेलियनची वाट धरली. अवघ्या ३४ धावांवर भारताचे ३ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर रोहितने अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला. त्याने विराटसोबत मिळून ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने १७६ धावा केल्या.

२) जसप्रीत बुमराहला १८ वे षटक देण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी केलेली शानदार सुरुवात भारतीय संघाला विजयापासून दूर घेऊन जात होते. डेव्हिड मिलर आणि क्लासेनच्या फटकेबाजीने दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शेवटच्या १८ चेंडूत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २२ धावांची गरज होती. त्यावेळी रोहितने बुमराहला शेवटचं षटक न देता १८ वे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. त्या षटकात त्याने केवळ २ धावा खर्च केल्या आणि भारतीय संघाला दमदार कमबॅक करून दिलं.

३) रविंद्र जडेजाला गोलंदाजी न देणं

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फिरकी गोलंदाजांचा चांगलाच अभ्यास करून आले होते. त्यांनी फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठमोठे फटके खेळले. जडेजाने आपल्या पहिल्या षटकात १२ धावा खर्च केल्या. त्यामुळे रोहितने त्याला पुन्हा गोलंदाजी दिलीच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT