suryakumar yadav twitter
Sports

Suryakumar Yadav: मानलं भावा तुला...खाली पडलेली इंडियाची कॅप पाहून सूर्याने असं काही केलं;Video पाहून कौतुकच कराल

Suryakumar Yadav Viral Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav News In Marathi: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १३५ धावांनी शानदार विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ही मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली. या सामन्यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने असं काही केलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सूर्याचा व्हिडिओ व्हायरल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान, सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये रवी बिश्नोई आणि रिंकू सिंग विकेट घेतल्यानंतर जल्लोष करत होते. त्यावेळी सूर्यकुमार यादव त्यांना मिठी मारण्यासाठी येतो. त्यावेळी रिंकूची कॅप खाली पडते. त्या कॅपवर कोणाचाही पाय पडू नये, म्हणून सूर्यकुमार यादव पूर्ण प्रयत्न करतो.

मात्र सूर्याचा पाय कॅपला लागतोच. कॅपला पाय लागताच त्याने ती कॅप उचलली आणि कॅपच्या पाया पडला त्यानंतर त्याने कॅपला किस केले. त्याच्या या कृत्याचं जोरदार कौतुक होत आहे. सूर्यकुमार यादव हा हार्दिक पंड्यानंतर वर्तमान भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

२०२१ मध्ये त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. काही महिने तो टी-२० फलंदाजांच्या यादीत नंबर १ स्थानी होता. रोहितने टी-२० क्रिकेटला रामराम केल्यापासून भारतीय टी-२० संघाची जबाबदारी सूर्याकडे सोपवण्यात आली आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून संजू सॅमसनने १०९ तर तिलक वर्माने १२० धावांची खेळी केली.

यासह भारतीय संघाने २० षटकअखेर २८३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेला १४८ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना हा सामना १३५ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT