भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यावर युवा फलंदाज शुभमन गिलला देखील भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. दरम्यान या मालिकेत त्याच्याकडे विराटचा मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.
विराट कोहलीने २०२३ मध्ये ८ शतकं झळकावली आहेत. तर शुभमन गिलने ७ शतक झळकावली आहेत. या दौऱ्यावर १ शतक झळकावताच तो विराटला मागे सोडू शकतो. यावर्षी त्याला ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. तर विराट कोहली केवळ कसोटी मालिका खेळताना दिसून येणार आहे. जर गिलने या ६ सामन्यांमध्ये दमदार खेळ केला तर तो विराटला मागे सोडू शकतो.
शुभमन गिलची दमदार कामगिरी..
शुभमन गिलने २०२३ मध्ये दमदार खेळ केला आहे. त्याने यावर्षी ४५ सामन्यांमध्ये ५०.४२ च्या सरासरीने २११८ धावा केल्या आहेत. यावर्षी २००० धावांचा पल्ला गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने यावर्षी त्याने १० अर्धशतक आणि ७ शतकं झळकावली आहेत. तर विराट कोहलीने ३४ सामन्यांमध्ये ६६.६८ च्या सरासरीने १९३४ धावा केल्या आहेत.
शुभमन गिलला यावर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे विराटची बरोबरी करण्यासाठी गिलला ६ सामन्यांमध्ये १ शतक झळकवयाचं आहे. जर त्याने २ शतकं झळकावली तर तो विराटला या रेकॉर्डमध्ये मागे सोडेल. (Latest sports updates)
गिल आणि विराटनंतर डॅरिल मिचेल या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. डॅरिल मिचेलने यावर्षी खेळलेल्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ६ शतकं झळकावली आहेत. तर न्यूझीलंडचा कर्णधार हसन शांतो आणि कॉनव्हेने ५-५ शतके झळकावली आहेत. एकाच वर्षात सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने १९९८ मध्ये एकाच वर्षात १२ शतकं झळकावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.