team india twitter
क्रीडा

IND vs SA, Playing XI: टीम इंडियात होणार मोठा बदल? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहित या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

India vs South Africa Playing 11 Prediction: या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

India vs South Africa Playing 11 Prediction:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा दरारा सुरू आहे. आतापर्यंत खेळलेल्या ७ पैकी ७ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. आता आठव्या सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघाने श्रीलंकेला धूळ चारत सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११.

भारतीय संघाला मोठा धक्का!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्या गोलंदाजी करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला काही सामने संघाबाहेर राहावं लागलं. असं म्हटलं जात होतं की, सेमीफायनलच्या सामन्यात तो कमबॅक करू शकतो. (IND vs SA Playing 11 Prediction)

मात्र असं काही झालेलं नाही. अखेर दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं आहे. हार्दिक पंड्या बाहेर झाल्यानंतर केएल राहुलकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Team India Playing 11)

या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी ईडन गार्डन्सवर कसून सराव केला. तर श्रीलंकेला धूळ चारणारे तीनही वेगवान गोलंदाज सराव करण्यासाठी मैदानावर आले नाही. भारतीय फलंदाज २ तास केवळ फलंदाजीचा सराव करत होते.

अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा देखील नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून आला. रोहित, शुभमनसह विराट कोहली देखील फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला.

हे पाहून असं दिसून येत आहे की, भारतीय संघ गेल्या सामन्यात ज्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरला होता तिच प्लेइंग ११ या सामन्यातही कायम असू शकते.

अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT