IND vs SA Twitter/@BCCI
Sports

IND vs SA: भारताचं पारडं जड, आफ्रिकेला मोठा धक्का; अशी आहे प्लेईंग-11

आजच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (IND vs SA ODI Series Live) आज (19 जानेवारी 2022) खेळला जाणार आहे. लोकेश राहुल आणि टेंबा बावुमा कर्णधार म्हणून आमनेसामने असणार आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. कसोटी मालिकेत भारताला 2-1 ने पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ (Team India) पहिल्यांदाच केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात खेळणार आहे. त्यामुळे संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतासाठी आनंदाची आणि दक्षिण आफ्रिकेला धक्का देणार बातमी म्हणजे कागिसो रबाडा वनडे मालिकेतून बाहेर पडणं. विश्रांती म्हणून रबाडाने मालिकेतून माघार घेतली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (latest News on IND vs SA ODI Series)

व्यंकटेश अय्यरचा डेब्यू होणार!

व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) न्यूझीलंडविरुद्ध टी-20 पदार्पण केले आणि आता त्याचे एकदिवसीय पदार्पणही निश्चित दिसते आहे. संघ व्यवस्थापन अय्यरला सहाव्या क्रमांकावर उतरवू शकते. अय्यर हा सलामीवीर आहे पण संघ व्यवस्थापन त्याला मधल्या फळीत हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून वापरु शकते. अय्यरने भारताच्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर यांनाही अंतिम-11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

भारताची संघ

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), येनेमन मलान, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, रसी व्हॅन डर ड्यूसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहुलक्यो, मार्को यान्सन, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, केशव महाराज.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT