nandre burger vs virat kohli twitter
Sports

Virat Kohli: नजरेला नजर भिडली!नांद्रे बर्गरने पंगा घेताच विराटने दिली अशी रिॲक्शन;Video

Virat Kohli Viral Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

Nandre Burger vs Virat Kohli:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा नवखा गोलंदाज नांद्रे बर्गर विराट कोहलीला खुन्नस देताना दिसून आला. दरम्यान विराटने त्याला दिलेली रिअॅक्शन सध्या जोरदार व्हायरल होऊ लागली आहे.

तर झाले असे की,जोरदार फॉर्ममध्ये असलेला नांद्रे बर्गर भारतीय संघाचा पहिला डाव सुरु असताना १५ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकात त्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला ३९ धावांवर बाद करत माघारी धाडलं. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला.

विराट कोहली फलंदाजीला येताच पहिल्या चेंडूपासूनच नांद्रे बर्गरने विराटवर दबाव बनवायला सुरुवात केली. त्याने टाकलेला तिसरा चेंडू विराटने उत्तमरित्या खेळून काढला. हा चेंडू नांद्रे बर्गरने फॉलो थ्रुमध्ये पकडला आणि विराटला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तो विराटला खुन्नस देताना दिसून आला. (Latest sports updates)

विराटची हटके रिअॅक्शन व्हायरल..

नांद्रे बर्गर आक्रमक दिसून आला. मात्र विराटने त्याला हसत उत्तर दिलं. नांद्रे बर्गरच्या पुढच्या चेंडूवर विराटने एकही धाव घेतली नाही. त्यानंतर पुढील चेंडू विराटच्या बॅटचा कडा घेत स्लिपमध्ये गेला.

त्यानंतर शेवटच्या चेंडूवर विराटने चौकार मारत नांद्रे बर्गरला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी सुनील गावसकर हे समालोचकाच्या भूमिकेत होते. त्यावेळी ते म्हणाले की, विराटने चुकीच्या व्यक्तीसोबत पंगा घेतला आहे.

भारतीय संघाचा डाव १५३ धावांवर संपुष्टात..

दक्षिण आफ्रिकेचा डाव ५५ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी आला होता. भारतीय संघाला या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र असं होऊ शकलं नाही कारण भारतीय संघाचा डाव अवघ्या १५३ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४६, रोहित शर्माने ३९ आणि शुभमन गिलने ३६ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT