south africa google
Sports

IND vs SA 2nd Test: अवघ्या ११ चेंडूत पडल्या टीम इंडियाच्या ६ विकेट्स! केपटाऊन कसोटीत नेमकं काय घडलं?

India vs South Africa 2nd Test Day 1: केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनासह भारतीय फलंदाजही पूर्णपणे फ्लॉप ठरले. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd Test:

केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनासह भारतीय फलंदाजही पूर्णपणे फ्लॉप ठरले. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला. मुख्य बाब म्हणजे भारतीय संघातील ७ फलंदाज खाते ही न उघडता माघारी परतले.

पहिल्या सामना गमावलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात मोठी आघाडी घेण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. मात्र भारतीय संघाला या संधीचा पुरेपूर लाभ घेता आला नाही. मोठी आघाडी घेण्याची संधी असताना भारतीय संघ १०० धावांची आघाडी घेऊ शकला नाही. भारतीय संघाची धावसंख्या १५३ असताना केएल राहुल बाद होऊन माघारी परतला. इथून विकेट्सची रांग लागली. एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत होते. प्रसिद्ध कृष्णाला कगिसो रबाडाने बाद करत माघारी धाडलं. (Latest sports updates)

११ चेंडूत अन् ६ विकेट्स..

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने डावातील ३४ व्या षटकात ३ भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. त्याने पहिल्या चेंडूवर केएल राहुलला, तिसऱ्या चेंडूवर रविंद्र जडेजा आणि पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहला बाद केलं.

पुढील षटक टाकण्यासाठी कगिसो रबाडा गोलंदाजीला आला. त्याने दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला बाद केलं. त्यानंतर सिराज धावबाद होऊन माघारी परतला. षटकातील पाचव्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णा बाद होऊन माघारी परतला. यासह भारतीय संघाचा डाव अवघ्या १५३ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेच्या २ गोलंदाजांनी मिळून भारतीय संघाचा डाव अवघ्या ११ चेंडूत संपवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT