team india twitter
क्रीडा

IND vs SA 2nd T20I: रिंकूने आफ्रिकेच्या गोलंदाजांना आधी धू-धू धुतलं, नंतर BCCIची मागितली माफी; वाचा कारण

Rinku Singh Six Breaks Media Box Glass: पहिला सामना पावसामुळे रद्द झाला,तर दुसऱ्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. या सामन्यानंतर रिंकू सिंगने माफी मागितली आहे.

Ankush Dhavre

Rinku Singh Apologies:

रिंकू सिंग हे नाव गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्याची आक्रमक फलंदाजी. भारतीय मैदांनावर धुमाकूळ घालणारा रिंकू सिंग परदेशात कशी कामगिरी करेल यावर सर्वांचं लक्ष लागुन होतं. मात्र त्याने दक्षिण आफ्रिकेतही आपल्या आक्रमक फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला,तर दुसऱ्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. (Rinku Singh Breaks Press Box Glass)

भारताचा पराभव, रिंकूने जिंकलं मन..

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाकडून रिंकू सिंगने ३९ चेंडूंचा सामना करत नाबाद ६८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. भारतीय संघाचा डाव संपायला ३ चेंडू शिल्लक होते. अन्यथा तो आणखी मोठी खेळी करु शकला असता.

षटकार मारून फोडली काच..

या सामन्यातही रिंकू सिंगचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्याने एडेन मार्करमच्या गोलंदाजीवर स्टेप आऊट होऊन सलग दोन षटकार मारले. पहिला षटकार त्याने लेग साईडच्या दिशेने मारला. तर दुसरा षटकार त्याने एकदम सरळ मारला. हा षटकार त्याने मीडिया बॉक्सला जाऊन लागला. या शॉटसह त्याने मीडिया बॉक्सची काच फोडली. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

सामन्यानंतर मागितली माफी..

या सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत रिंकू सिंगने माफी मागितली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या गेम प्लानबद्दल खुलासा केला. तसेच त्याने काच फोडल्यामुळे बीसीसीआयची माफी देखील मागितली आहे. हा मजेशीर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

SCROLL FOR NEXT