dean elgar twitter
Sports

Dean Elgar Record: एल्गरचा 'एल्गार'! डबल सेंच्युरी हुकली पण टीम इंडियाविरुद्ध केला हा मोठा रेकॉर्ड

India vs South Africa 1st Test: शेवटच्या कसोटी मालिकेत डीन एल्गरची बॅट जोरदार तळपली आहे. भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात डीन एल्गरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला

Ankush Dhavre

India vs South Africa, 1st Test Day 3:

शेवटच्या कसोटी मालिकेत डीन एल्गरची बॅट जोरदार तळपली आहे. भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात डीन एल्गरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात डीन एल्गरने १८५ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

रोहितला सोडलं मागे..

डीन एल्गरने या डावात २८७ चेंडूंचा सामना करत २८ चौकारांच्या साहाय्याने १८५ धावांची खेळी केली आहे. या खेळीसह तो भारत - दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत सर्वात मोठी खेळी करणारा नववा फलंदाज ठरला आहे.

या मोठ्या रेकॉर्डमध्ये त्याने रोहित शर्माला मागे सोडलं आहे. रोहित शर्माने २०१९ मध्ये विशाखापट्टणम कसोटीत २४४ चेंडूंचा सामना करत १७६ धावांची खेळी केली होती. तसेच भारतीय संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने केलेली तिसरी सर्वात मोठी खेळी आहे. (Latest sports updates)

सलामीवीर म्हणून ५००० धावा पूर्ण..

डीन एल्गरने सलामीवीर फलंदाज म्हणून ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ग्रीम स्मिथ (९०१८), गॅरी कर्स्टन(५७२६) आणि हर्षल गिब्सने( ५२४२) हा कारनामा करून दाखवला आहे.

दक्षिण आफ्रिकेची १६३ धावांची आघाडी...

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव ४०८ धावांवर संपुष्टात आला. यासह दक्षिण आफ्रिकेने १६३ धावांची आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना डीन एल्गरने सर्वाधिक १८५ धावांची खेळी केली. तर मार्को यांसेनने ८४ धावांची नाबाद खेळी केली. तर डेव्हिड बेडिंगहॅमने ५६ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT