IND vs SA T20, Kuldeep Yadav Best Bowling  Saam TV
क्रीडा

IND vs SA: कुलदीप यादवने रचला इतिहास, वाढदिवशीच ५ विकेट्स; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय फिरकीपटू

IND vs SA 3rd T20 Match: टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वाढदिवसाच्या दिवशीच इतिहास रचला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ५ विकेट्स घेतल्या.

Satish Daud

IND vs SA T20, Kuldeep Yadav Best Bowling

टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वाढदिवसाच्या दिवशीच इतिहास रचला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. कुलदीपने २.५ षटकात १७ धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला.

त्याच्या या कामगिरीने टीम इंडियाने टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडियाला तिसरा टी-२० सामना जिंकणे गरजेचे होते.  (Latest Marathi News)

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडम मार्करमने टॉस जिंकत टीम इंडियाला (Team India) प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. दुसऱ्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. शुभमन गिल आणि तिलक वर्माने एकापाठोपाठ एक विकेट्स फेकल्या.

त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वालने आफ्रिकेच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट्साठी शतकी भागीदारी केली.यशस्वीने ६० धावांची दमदार खेळी साकारत सूर्याला चांगली साथ दिली.

यशस्वी बाद झाल्यानंतर सूर्याने धमाकेदार फटकेबाजी केली आणि आपले चौथे टी-२०मधील शतक पूर्ण केले. सूर्याच्या या शतकाच्या जोरावर भारताला २०१ धावा उभारता आल्या. टीम इंडियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले.

भारताकडून बर्थडे बॉय कुलदीप यादवने गोलंदाजीत इतिहास रचला. त्याने टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फिरकी गोलंदाज ठरला आहे. तिसरा टी-२० सामना जिंकून टीम इंडियाने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : साकोलीत नाना पटोले आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT