World Championship of Legends final India Vs Pak:  Saamtv
Sports

Ind Vs Pak WCL Final 2024: टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! 'लीजेंड्स लीग'मध्ये पाकिस्तानला लोळवलं; अंतिम सामन्यात दणदणीत विजय

World Championship of Legends final India Vs Pak: बर्मिंगहॅममध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेला अंतिम सामना युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली इंडिया चॅम्पियन्सने सहज जिंकला.

Gangappa Pujari

वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धुळ चारली. बर्मिंघम येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर पाच गडी राखून मात केली. अंबाती रायडू, युसूफ पठाण या विजयाचे शिल्पकार ठरले.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 चे विजेतेपद भारताने पटकावले. बर्मिंगहॅममध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेला अंतिम सामना युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली इंडिया चॅम्पियन्सने सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 156 धावा करू शकला आणि प्रत्युत्तरात भारतीय चॅम्पियन्सने 5 चेंडूत 5 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले.

अंबाती रायुडू या विजयाचा शिल्पकार ठरला. रायडूने शानदार अर्धशतक झळकावताना अवघ्या 30 चेंडूत 50 धावा केल्या. टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. अंबाती रायडूने पहिल्याच षटकात चौकार आणि एक षटकार मारला आणि उथप्पानेही हात दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. उथप्पाने 10 धावा केल्या. उथप्पानंतर रैनाही तिसऱ्या षटकात 4 धावा काढून बाद झाला.

तत्पुर्वी पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा केल्या. बर्मिंगहॅमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती पण भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. पाकिस्तानकडून शोएब मलिकने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्यांच्याशिवाय कामरान अकमल, शोएब मकसूद यांनी चांगली सुरुवात केली मात्र त्यांना मोठी खेळी खेळता आली नाही. कामरानने 24 आणि शोएब मकसूदने 21 धावा केल्या. सरतेशेवटी, सोहेल तन्वीरने 9 चेंडूत 19 धावा करत संघाला निश्चितच सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT