IND vs SL : भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक बदललं; आता कधी होणार सामने? जाणून घ्या

India tour of Sri Lanka 2024 : भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. २६ जुलैपासून सुरु होणारी टी२० मालिका आता २७ जुलैपासून सुरू होणार आहे. तर २ ऑगस्टपासून वनडे सामने खेळवले जाणार आहेत.
IND vs SL
IND vs SLSaam Digital
Published On

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात तीन टी२० आणि ३ वनडे सामने खेळवले जाणार आहेत. दोन्ही मालिकांचं वेळापत्रक जाही करण्यात आलं होतं. मात्र त्यात आता बदल करण्यात आले आहेत. २६ जुलैपासून सुरु होणारी टी२० मालिका आता २७ जुलैपासून सुरू होणार आहे. तर २ ऑगस्टपासून वनडे सामने खेळवले जातील.

नवीन वेळापत्रकानुसार, २७, २८ आणि ३० जुलै या तीन दिवशी अनुक्रमे टी२० मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना होणार आहे. टी२० मालिकेतील प्रत्येक सामन्याची तारीख एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. हे सर्व सामने पाल्लेकेले येथे खेळवले जाणार आहेत.

टी-२० मालिका

पहिला सामना - २७ जुलै.

दुसरा सामना - २८ जुलै

तिसरा सामना - ३० जुलै

वनडे मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना २, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळवले जाणार आहेत. गे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जाणार आहेत. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.

वन डे मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना - २ ऑगस्ट

दुसरा सामना - ४ ऑगस्ट

तिसरा सामना - ७ ऑगस्ट

IND vs SL
Team India News: T-20 WC नंतर विराट, रोहितला विश्रांती, तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून ५ सामन्याच्या टी-२० मालिकेतील शेवटाचा सामना बाकी आङे. दौरा १४ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातही काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता असून संघाची लवकरच निवड करण्यात येईल.

IND vs SL
Team India News: T-20 WC नंतर विराट, रोहितला विश्रांती, तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com