IND vs PAK Virat Kohli Hardik Pandya Emotional Saam TV
क्रीडा

IND vs PAK T20 : विराट, हार्दिक मैदानावरच रडले; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर काय घडलं? पाहा VIDEO

भारताने हा सामना (Ind vs Pak) जिंकल्यानंतर मैदानावरच दोन्ही खेळाडू भावूक झाले होते.

Satish Daud

T20 World Cup IND vs PAK : मेलबर्न येथे झालेली टी२० सामन्यांत भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने विश्वचषकामध्ये विजयी सलामी दिली. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले. हार्दिकने ४० तर विराटने नाबाद ८२ धावा चोपल्या. दरम्यान, भारताने हा सामना  (Ind vs Pak)  जिंकल्यानंतर मैदानावरच दोन्ही खेळाडू भावूक झाले होते. (IND vs PAK Virat Kohli Hardik Pandya Emotional)

भारताने पाकिस्तानला हरविल्यानंतर काय घडलं?

भारतीय संघाला शेवटच्या षटकांत १६ धावांची गरज होती. विराटने षटकार आणि ३ धावा घेत भारतीय संघाला विजयाच्या जवळ नेलं. शेवटच्या चेंडूवर एका धावाची गरज असताना रविचंद्रन आश्विनने चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघ (Team India) विजय होताच विराटने मैदानावर आनंदाने उड्या मारल्या. इतकंच नाही तर त्याने जबदस्त जल्लोषही केला. यावेळी विराट हा भावूक देखील झाला असल्याचं पाहायला मिळालं.

सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याही रडला

भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारत २०२१ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. यावेळी आनंद साजरा करत असताना अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यालाही अश्रूंचा बांध फुटला होता. विजयानंतर हार्दिकने विराटला मिठी मारली. संपूर्ण टीमने या दिग्गज खेळाडूला शुभेच्छा दिल्या. कॅप्टन रोहित शर्माने तर विराटला खांद्यावर उचलून घेतलं. रोहितने, विराटची ही करियरमधील सर्वोत्तम इनिंग असल्याचं म्हटलं आहे.

विराटने हरलेली सामना जिंकून दिला

पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. रोहित शर्मा आणि केएल राहुल ही सलामीची जोडी प्रत्येकी ४-४ धावा करून माघारी परतली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लयीत दिसत असताना सूर्यकुमारही बाद झाला. सूर्यकुमारनंतर डावखुरा फलंदाज अक्षर पटेल हा सुद्धा धावबाद झाला. त्यामुळे एकवेळ भारतीय संघाची स्थिती ४ बाद ३१ झाली होती.

भारतीय संघ हा सामना गमावणार असं वाटत असतानाच, विराटच्या साथीला हार्दिक पांड्या धावून आला. हार्दिक आणि विराटने सुरूवातील सावध फलंदाजी केली. लय प्राप्त केल्यानंतर दोन्हीही फलंदाजींनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना झोडपून काढलं. शेवटच्या षटकात १६ धावा हव्या असताना हार्दिक पांड्या ४० धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराटने डाव सांभाळत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budhaditya Rajyog: मंगळाच्या राशीत तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा, व्यवसायातही होणार लाभ

Anil Deshmukh : बापावर हल्ला, मुलगा मैदानात; सलील देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर इजा, उपचार सुरु; वातावरण तापलं

Today Horoscope: 'या' राशीला मिळणार राजयोग,५ राशींवर राहणार देवाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

SCROLL FOR NEXT