IND vs PAK T20 World Cup 2022 Saam TV
क्रीडा

IND vs PAK T20 : बोल्ड झाल्यानंतरही विराटला ३ धावा कशा मिळाल्या? फ्री हिटचा नियम काय सांगतो?

Satish Daud

IND vs PAK T20 : टी २० विश्वचषकात आज भारताचा मुकाबला पाकिस्तान संघासोबत झाला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यांत भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. विराट कोहली हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग हे विजयाचे हिरो ठरले. या विजयासह भारताने (Team India) गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. (IND vs PAK T20 World Cup Latest Updates)

पाकिस्तानने या सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना (Ind vs Pak)  भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीर रोहित शर्मा आणि केएल राहुलची जोडी झटपट माघारी परतली. रोहित आणि राहुलला केवळ ४-४ धावाच करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सूर्यकुमार थोडा लयीत दिसला. मात्र १५ धावा काढून तो देखील बाद झाला.

एकवेळ भारतीय संघाची अवस्था ४ बाद ३१ अशी झाली होती. या परिस्थितीतून कोहलीनं हार्दिक पांड्याच्या मदतीनं डाव सावरला. विराट आणि हार्दिकनं ११३ धावांची भागिदारी साकारत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

अखेरच्या दोन षटकांत भारतीय संघाला विजयासाठी तब्बल ३१ धावांची गरज होती. हारिस रौऊफने टाकलेल्या १९ व्या षटकांत कोहलीने १५ धावा कुटल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती. पाकिस्तानकडून डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाझने हे षटकं टाकलं. त्याने पहिल्याचं चेंडूवर हार्दिक पांड्याला बाद केलं.

हार्दिक बाद झाल्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर भारताला केवळ तीनच धावा काढता आल्या. अखेरच्या तीन चेंडूत विजयासाठी १३ धावा हव्या असताना कोहलीने षटकार ठोकला. हा चेंडू कमरेच्या वर असल्याने पंचांनी तो नो बॉल दिला. पुढच्या चेंडूवर कोहलीला फ्री हिट मिळाली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नांदात कोहली बोल्ड झाला. चेंडू स्टम्पला लागून थर्ड मॅनच्या दिशेनं गेला. ते पाहून कोहली आणि कार्तिकने पळून ३ धावा काढल्या. यावर पाकिस्तानच्या खेळाडूंनी आक्षेप घेतला. मात्र, पंचानी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला.

फ्री हिटवर बोल्ड झाल्यानंतरही फलंदाजाला धावा काढता येतात का?

दरम्यान, फ्री हिटवर बोल्ड झाल्यानंतर खेळाडूला धावा काढता येतात का? असा प्रश्न अनेकांना पडला. आयसीसीच्या नियमानुसार, जर फ्री हिट असेल आणि फलंदाज क्लीन बोल्ड झाला असेल तर तो डेड बॉल दिला जात नाही. कोहली बोल्ड झाला त्यामुळे तो नाबाद होता. त्यातच चेंडू स्टंपला लागून थर्डमॅनच्या दिशेने गेल्याने त्याने पळून ३ धावा काढल्या. बऱ्याच कमी लोकांना हा नियम माहित आहे. फ्री हिटमध्ये रनआऊट दिलं जातं, पण कोहली ३ धावा काढून सुरक्षित क्रिजमध्ये पोहचला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT