IND vs PAK Final saam tv
Sports

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशी बाद झाल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूने नको ते केलं; भारताने घेतला बदला, चौकार-षटकारांचा पाऊस

Asian Games cricket final: भारत-पाकिस्तान एशियन गेम्स फायनलमध्ये सॅम अयूबने वैभव सूर्यवंशीला 15 धावांवर बाद केलं. त्यानंतर अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 28 चेंडूत 61 धावा ठोकल्या आणि पाकिस्तानविरुद्ध जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुष क्रिकेटचा गोल्ड मेडलचा सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय टीमचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वीपासूनच सर्वांचं लक्ष युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे होतं. त्याने सुरुवातही धडाकेबाज केली. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो केवळ 15 धावांवर बाद झाला.

सॅम अयूबचं डिवचणारं सेलिब्रेशन

वैभवला पाकिस्तानचा गोलंदाज सॅम अयूबने बाद केले. विकेट मिळाल्यानंतर सॅम अयूबने केलेलं सेलिब्रेशन मात्र वैभवसोबत ओपनिंगला आलेल्या अभिषेक शर्माला अजिबात आवडलं नाही. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये स्ट्राइक मिळताच अभिषेकने सॅम अयूबला आपल्या फलंदाजीने जोरदार उत्तर दिलं.

अभिषेकने सलग दोन फोर आणि एक सिक्स लगावला

वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला वेगवान सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या दोन ओव्हर्समध्ये भारताच्या धावसंख्येत 28 रन्स जोडले. यानंतर तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल सॅम अयूबने टाकला. या चेंडूवर वैभवने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चुकला आणि 15 रन्सवर बाद झाला.

यानंतर ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर संजू सॅमसनने एक रन घेत अभिषेक शर्माला स्ट्राइक दिली. तिसऱ्या बॉलवर एकही रन काढला नाही. मात्र त्यानंतर अभिषेकने सॅम अयूबला जोरदार फटके मारण्यास सुरुवात केली.

चौथ्या चेंडूवर अभिषेकने वाइड लॉन्ग ऑनच्या दिशेने जोरदार षटकार ठोकला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने चौकार मारला. ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर अभिषेकने चौकार ठोकला. त्यामुळे सॅम अयूबने या ओव्हरमध्ये वैभवची विकेट मिळवली असली तरी त्याला भारताच्या रन्सचा वेग कमी करता आला नाही. उलट या ओव्हरमध्ये त्याने तब्बल 15 रन्स दिले.

पाकिस्तानविरुद्ध पुन्हा दिसला अभिषेकचा धडाका

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात अभिषेक शर्माचा पुन्हा एकदा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्याने अवघ्या 28 चेंडूंत 61 रन्सची तुफानी खेळी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन वेळा 50 पेक्षा जास्त रन्सची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेकने विराट कोहलीची बरोबरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG पंपावर गाडीत गॅस भरतानाच महाभयंकर स्फोट! क्षणात कारचे तुकडे-तुकडे झाले; पाहा थरारक व्हिडिओ

Maharashtra News Live Update: पुण्याच्या मुळशीतील लवळे फाट्याजवळ भीषण अपघात

Electricity consumption: घरातील सर्वात जास्त वीज कोणत्या गॅजेटला लागते?

महाराष्ट्र भूकंपाने हादरला! सकाळ सकाळी ३ जिल्ह्यांमध्ये जाणवले हादरे; शाळेतून पोरांना बाहेर काढले, नागरिकांची पळापळ

Mangalsutra For Woman: साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट; महिलांसाठी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT