IND vs PAK Saam Tv
Sports

क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा संपली, जाणून घ्या IND vs PAK सामन्याची तिकिटे कधी मिळणार?

आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया चषक २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान सलामीच्या लढतीत लढणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान दुबईत भिडतील. दोन्ही देशांचे क्रिकेट (Cricket) चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. १५ ऑगस्टपासून तिकीटांची विक्री सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून ही माहिती दिली.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यासह प्रमुख क्रिकेट (Cricket) देश या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत, तर पात्रता सामने ओमानमध्ये UAE, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये खेळणार आहेत. पहिला सामना २० ऑगस्ट रोजी हाँगकाँग आणि सिंगापूर यांच्यात होणार आहे.

ही स्पर्धा यावर्षी श्रीलंकेत खेळवली जाणार होती, पण तेथील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे आयोजन समितीने ही स्पर्धा यूएईला हलविण्याचा निर्णय घेतला. आशिया कपपूर्वी भारतीय संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यासारखे खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत. या दौऱ्यातून केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय दीपक चहरही ६ महिन्यांनी संघात परतणार आहे.

आशिया चषकात टीम इंडियाने (Team India) ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंकेचा संघ ५ वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघांमध्ये कधीही अंतिम सामना झालेला नाही. भारताने ४ वर्षांपूर्वी बांगलादेशला हरवून आशिया कप जिंकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित ठकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट, नेमकं 'राज'कारण काय?

NCDC Recruitment: NCDC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार मिळणार २०८७०० रुपये; अर्ज कसा करावा?

Water Drinking Rules: चाळिशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग पाणी पिण्याच्या 'या' चूका टाळाच

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले, साडेचार किलो सोने आणि रोकड लंपास

बैलपोळा सणाला काळाचा घाला; ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू, खाटेवरून मृतदेह गावात आणला

SCROLL FOR NEXT