IND vs PAK Asia Cup Saam Tv
क्रीडा

IND vs PAK Asia Cup: पत्रकाराने विचारले 'टीम इंडिया पाकिस्तानमध्ये कधी येणार'; रोहित शर्माने दिले मजेशीर उत्तर

आशिया चषक २०२२ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया कप(Asia Cup) 2022 मध्ये टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. आज म्हणजे रविवारी २८ ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा कर्णधार बाबर आझमच्या संघाने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. आता भारतीय संघाला त्या पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी आहे. (IND vs PAK Asia Cup)

या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली. पत्रकार परिषदेत रोहित शर्माने (Rohit Sharma) भारतीय संघाची रणनीती, प्लेइंग-11 अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका पत्रकाराने रोहित शर्माला टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत प्रश्न विचारला. त्या पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला रोहित शर्माने असे उत्तर दिले की पत्रकार परिषदेत हशा पिकली.

'माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर असते तर मी नक्की उत्तर दिले असते. काय करावे आणि काय करू नये हे बोर्ड ठरवतात. हे आपल्या हातात नाही. समोर जे काही टूर्नामेंट दिसतो ते खेळायला आपण तिथे पोहोचतो. आम्हाला जिथे पाठवले जाईल तिथे आम्ही खेळू. हा खूप अवघड प्रश्न आहे. बोर्डाने ठरवले तर आम्ही खेळू, असं उत्तर रोहित शर्माने या प्रश्नाला दिले.

२००८ नंतर टीम इंडियाने पाकिस्तान दौरा केलेला नाही

२००८ पासून भारतीय क्रिकेट संघाने (Team India) पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. राजकीय आणि राजनैतिक संबंधांमुळे दोन्ही देशांचे संघ अद्याप द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. २०१२-१३ मध्ये भारतीय स्पिचवर दोन्ही देशांदरम्यान शेवटची मालिका झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा केला होता. पाकिस्तान संघाने एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळवला, तर टी-20 मालिका १-१ अशी बरोबरीत केली.

पाकिस्तान आणि भारतीय टीम मैदानावर जरी दोन्ही संघ आमनेसामने येणार असले तरी मैदानाबाहेरील खेळाडूंचा संवाद चांगला असल्याचे दिसत आहे. पीसीबीने शनिवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि बाबर आझम दीर्घकाळ संभाषण करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बाबर आझमच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (IND vs PAK Asia Cup)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT