IND vs Pak, Asia Cup 2025 Final : आम्ही दहशतवाद्यांना पोसत नाही, असे जागतिक पटलावर वर तोंड करून सांगणाऱ्या पाकिस्तानचा दुसरा चेहरा समोर आला आहे. आशिया चषकातील फायनल सामन्यानंतर कर्णधार सलामान आगा याने केलेल्या घोषणेनंतर पाकिस्तानचा बुरखा फाटला गेलाय. भारताने केलेल्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना फायनल सामन्याची फीस पाकिस्तानचा संघ देणार असल्याचे सलमान आगा याने सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानची जिरवली होती. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळाला टार्गेट केले होते. भारताच्या हल्ल्यात मृत पावलेल्या दहशतवाद्याच्या कुटुंबियाला मदत करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सरसावलाय, त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उडत आहे.
दुबईत रविवारी आशिया चषकाचा हाय व्होल्टेज अंतिम सामना रंगला. या सामन्यात भारातने पाच विकेटने विजय मिळवत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. आशिया चषकात भारताने लागोपाठ तीन सामन्यात पाकिस्तानची जिरवली. पण पाकिस्तान काही सुधारायचे नाव घेत नाही. पहलगाम हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानच्या खेळाडूसोबत संपूर्ण स्पर्धेत कोणताही संबंध ठेवला नाही. शेकहँड, फोटोशूट, ट्रॉफी घेण्यापासूनही भारताने नकार दिला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या चेहऱ्यावर हा राग दिसत होता. सामन्यानंतर सलमान आगा याने मोठी घोषणा केली. फायनल सामन्यासाठी मिळणारी संपूर्ण रक्कम ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. सलामान आगाच्या या वक्तव्यानंतर जागतिक पातळीवर याची चर्चा सुरू झाली.
आशिया चषक फायनल सामन्याची फीस संपूर्ण संघ भारताच्या हल्ल्यात प्रभावित झालेल्या लोकांना आणि मुलांच्या कुटुंबियांना दान करत आहोत, असे असे पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगा म्हणाला. दुबईत तो पत्रकारांशी बोलत होता. या वेळी आगा याने भारतीय संघावरही निशाणा साधला. भारताने आमच्यासोबत ते केले ते चुकीचं होतं, त्यांनी क्रिकेटचा अपमान केला, असे आगा म्हणाला.
सलमान आगा याच्या मदतीच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण, भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त दहशतवादी मारले गेले होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघ दहशतवाद्यांसोबत उभा आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. आमच्यासोबत हात न मिळवून ते आमचा अपमान करत नाही, तर ते क्रिकेटचा अपमान करत आहे. भारताने स्पर्धेत जे केले ते अतिशय निराशाजनक आहे, असेही सलमान आगा म्हणाला. आशिया चषकासोबत मी एकटाच फोटो काढायला गेलो होतो, कारण मी माझं कर्तव्य पार पडत होत. पुरस्कार वितरण कार्यक्रमात आम्ही तिथे उभे राहिले अन् मेडलही घेतले, असेही तो म्हणाला.
सूर्यकुमार यादव याच्यासोबत माझं काही वैर नाही. सूर्यकुमार यादव याचा स्वतचा निर्णय असता तर त्याने हात मिळवला असता. स्पर्धेच्या सुरूवातीला सूर्याने माझ्यासोबत हात मिळवला होता. रेफरी मिटिंगच्या वेळीही त्याने हात मिळवला होता. पण जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर असतो, त्यावेळी सूर्या हात मिळवत नाही. सूर्या त्याला सांगितलेल्या नियमाचे पालक करतोय. जर हात मिळवायचा की नाही, हे सूर्यावर असते तर त्याने शेकहँड केले असते, असे पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.