suryakumar yadav 
Sports

IND vs PAK : भारताला मोठा धक्का, पाकिस्तानविरोधात भिडण्याआधीच हुकमी एक्का दुखापतग्रस्त, सूर्याचं टेन्शन वाढलं

Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सरावावेळी शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला असून त्याचा खेळणे संदिग्ध आहे. या दुखापतीमुळे संघसंतुलन बिघडू शकते.

Namdeo Kumbhar

  • भारत-पाकिस्तान सामन्याआधी शुभमन गिल दुखापतग्रस्त.

  • सरावावेळी हाताला चेंडू लागल्याने गिल वेदनेत.

  • संघाच्या मेडिकल टीमकडून गिलच्या फिटनेसवर लक्ष.

  • सूर्यकुमार यादव नेतृत्वाखाली भारतीय संघ चिंतेत.

  • दुबईत आज रात्री ८ वाजता सामना रंगणार.

Shubman Gill injury update before India vs Pakistan clash : आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तानमध्ये आरपारची लढाई होणार आहे. पण सामना सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी सराव करताना सलामी फलंदाज शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला आहे. दुबईत होणाऱ्या आजच्या सामन्यात गिल खेळणार का? याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत. सराव करताना गिलच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण चेंडू हाताला जोरात लागल्यानंतर गिल याला पाण्याच्या बॉटलचे झाकणही उघडता आले नव्हते. त्यामुळे गिलच्या दुखापतीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानविरोधातील हायव्होलेट्ज सामन्याआधी शनिवारी भारतीय संघाने कसून सराव केला. पण या सराव सामन्यावेळी भारताचा हुकमी एक्का शुभमन गिल याच्या हाताला जोरात चेंडू लागला. त्यामुळे गिल प्रचंड वेदनेत होता. गिलला चेंडू लागल्यानंतर तात्काळ फिजिओने मैदानात धाव घेत उपचार केले. पण गिलच्या वेदना काही थांबल्या नाहीत. कर्णधार सूर्यकुमार यादव याने गिलसोबत त्यानंतर चर्चाही केली. गिल पाकिस्तानविरोधातील महत्त्वाच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. त्याची दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाने यूएईच्या संघाचा दारूण पराभव करत आशिया चषकाची सुरूवात दणक्यात केली. पाकिस्ताननेही ओमानचा पराभव करत चांगली सुरूवात केली आहे. आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये टक्कर होत आहे. आज कोणता संघ बाजी मारणार याकडे क्रीडा विश्वाच्या नजरा लागल्या आहेत. पण त्याआधीच भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर आली. गिल याला गंभीर दुखापत झाली आहे. शुभमन गिल याच्या दुखापतीवर मेडिकल टीम लक्ष देऊन आहे. त्याच्यावर उपचार केले जात आहे. गिल याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, वर्षभर गिल टी२० क्रिकेटपासून दूरच होता. त्याने वर्षभरात फक्त एक टी२० सामना खेळला, त्यामध्ये त्याला २० धावाच करता आल्या होत्या. गिल याने २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये एक शतक आणि ३ अर्धशतके ठोकली आहेत.

भारत-पाकिस्तानचा थरार कधी?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना आज सायंकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. त्याशिवाय सोनी लिव एप आणि वेबसाइटवर दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

Dashavatar Collection : बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'चा बोलबाला; दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं केली जादू, २ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT