India Saam Tv
Sports

IND vs NZ : टीम इंडियाचा मालिकेवर 1-0 ने कब्जा, पावसामुळे तिसरा सामना रद्द

न्यूझीलंडने भारतासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते पण 9 षटकात संघाची धावसंख्या 4 बाद 75 अशी होती, तेव्हा पावसामुळे खेळ थांबवावा लागला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

INDvsNZ T20 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेवर टीम इंडियाने कब्जा केला आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 1-0 अशी जिंकला आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. न्यूझीलंडने भारतासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते पण 9 षटकात संघाची धावसंख्या 4 बाद 75 अशी होती, तेव्हा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसाचा जोर इतका होता की सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. (Cricket News)

या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 65 धावांच्या धुव्वा उडवला होता. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 19.4 षटकात 160 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 161 धावांचे लक्ष्य मिळाले होते. (Sports News)

पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने 9 षटकांत 75 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, भारताला विजयासाठी 9 षटकात 76 धावांची गरज होती, परंतु सामना थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या फक्त 75 धावांवर होती. अशा प्रकारे सामना अनिर्णित राहिला. मात्र, भारतीय संघ मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. टीम इंडियाने मालिका 1-0 ने जिंकली.

सिराज-अर्शदीप चमकले

भारतीय गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ 19.4 षटकांत 160 धावांवर गारद झाला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी 4-4 विकेट पटकावल्या. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 37 धावांत 4 खेळाडू बाद केले. तर मोहम्मद सिराजने 4 षटकात 17 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय हर्षल पटेलला 1 विकेट मिळाली. न्यूझीलंडकडून ड्वेन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांनी अर्धशतकी खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसीत ठाकरे गटाच्या नॉटरिचेबल असलेल्या चार नगरसेवकांपैकी स्वप्नाली केणे घरी परतल्या

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Heart Attack: दररोज ५ किमी धावणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला २ हार्ट स्टेंट्स; हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण वेळीच ओळखा

महिलेसोबत भयंकर घडलं, फ्लाइंग Kiss दिला अन् कारने पाठलाग केला, तासभरातच रोड रोमिओला अद्दल, नेमकं काय घडलं? VIDEO

Pension Hike: महत्त्वाची बातमी! EPFO कर्मचार्‍यांची पेन्शन ₹६५००नी वाढणार? सरकारने एका झटक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT