FIFA World Cup 2022: ईरानी खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; हिजाबचा विरोध केल्यानं स्वदेशी परतल्यावर मिळणार मोठी शिक्षा?

Anti Hijab Protest In Iran : वर्ल्ड कपचा सामना सुरू होण्याआधी दोन्ही टीम हे आपापल्या देशाचं राष्ट्रगीत गातात, पण ईरानच्या संघान चक्क आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गायला नकार दिला आहे
Iran National Football Team
Iran National Football TeamInstagram/@iran_football_federation
Published On

Anti Hijab Protest In Iran : कतारमध्ये फीफा वर्ल्ड कप २०२० ही जागतिक फूटबॉल स्पर्धा सुरू आहे. सोमवारी ईरान आणि इंग्लंड या टीम समोरासमोर आल्या. ही मॅच इंग्लंड संघाने ६-२ असा मोठ्या फरकाने जिंकली. पण, हा सामना जगाच्या लक्षात राहिला तो एका वेगळ्या कारणामुळे. वर्ल्ड कपचा सामना सुरू होण्याआधी दोन्ही टीम हे आपापल्या देशाचं राष्ट्रगीत गातात, पण ईरानच्या संघान चक्क आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गायला नकार दिला आहे.

याचं कारण म्हणजे ईरानमध्ये (Iran) सुरू असलेले हिजाब (Hijab) विरोधी आंदोलन. आपल्या देशातल्या महिलांचं समर्थन करण्यासाठी ईरानच्या संघाने फीफा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रगीत गायलं नाही. त्यामुळे आता या खेळाडूंवर ईरानी सरकारकडून कठोर कारवाई होऊ शतके अशी माहिती मिळत आहे. (FIFA World Cup 2022 Latest News)

Iran National Football Team
भारत की पाकिस्तान कोण चांगला मित्र? अमेरिकेने दिलं भन्नाट उत्तर

ईरानमध्ये २२ वर्षांची तरुणी महसा अमीनी हिचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. तिने हिजाब चुकीच्या पद्धतीने घातला असल्याचा आरोप ठेवत तिला अटक करण्यात आली होती. तिच्या संशयास्पद मृत्यूनंतर ईरान देशात हिजाब विरोधात आंदोलन सुरू झाले, हे आंदोलन आता संपूर्ण ईरानमध्ये पसरलं आहे.

अनेक ईरानी महिला आपला हिजाब जाळून आणि केसं कापून हिजाबचा विरोध करतायत. सोमवारी जेव्हा ईरानची टीम मैदानात उतरली, तेव्हा ईरानी खेळाडूंनी आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गायलं नाही. यावेळी स्टेडिअममधील ईरानी महिलांनीदेखील खेळाडूंचं समर्थन करत झेंडे फडकवले. यावेळी ईरानी खेळाडू भावनिक झाल्याचे दिसून आले. (Iranian players refuse to sing national anthem)

Iran National Football Team
Shraddha Walker Case : घटनेबद्दल आठवणे कठीण झालंय, कोर्टात कबुली देतानाच आफताब काय काय म्हणाला? वाचा

खेळाडूंवर होऊ शकते कठोर कारवाई

आंतरराष्ट्रीय मंचावरुन आपल्याच देशाच्या सरकारला विरोध केल्यानंतर संघाला आता धोका निर्माण झाला आहे. ईरानी सरकार आपल्याच खेळाडूंवर कठोर कारवाई करु शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, ईरानमध्ये या संघातील खेळाडूंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आपल्याच सरकारला आवाहन दिल्याबद्दल ईरानी खेळाडूंना तुरूंगात जावं लागू शकतं, किंवा त्यांना सरकारकडून नजरकैदेत ठेवलं जाऊ शकतं. याची कल्पना असूनही ईरानी खेळाडूंनी केलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com