Ishan Kishan produced a sensational comeback in the fifth T20 against New Zealand, saam tv
Sports

IND vs NZ T20: इशान किशनकडून किवींच्या गोलंदाजांची धुलाई, ४२ चेंडूत ठोकलं शतक

Ishan Kishan Smashes Century: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात इशान किशनची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. किवींच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने शानदार शतकी खेळी केली. त्याने फक्त ४२ चेंडूत १०० धावा ठोकल्या.

Bharat Jadhav

  • भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात इशान किशनची झंझावाती खेळी केलीय.

  • अवघ्या ४२ चेंडूत शतक झळकावत किवी गोलंदाजांची धुलाई केली आहे.

  • टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील इशान किशनचे पहिले शतक.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात इशान किशनला खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात इशान किशनने शानदार पुनरागमन केले. यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात ४२ चेंडूत शतक ठोकलं. टी२० क्रिकेट करिअरमधील हे त्याचे पहिले शतक आहे.

धावांचा वर्षाव करणाऱ्या इशान किशननं २८ चेंडूतच अर्धशतक केलं.अर्धशतक झाल्यानंतर त्याने झटक्यात पुढील ५० धावा केल्या. त्याने फक्त ४२ चेंडूत १०० धावांचा आकडा गाठला. म्हणजेच त्याने फक्त १४ चेंडूत ५० ते १०० धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंडविरुद्ध टी२० मध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. इशानने ४३ चेंडूत १०३ धावा केल्या, यात ६ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता.

दरम्यान न्युझीलंड संघाकडून १२ षटक टाकणारा ईश सोधीची त्याने चांगलीच धुलाई केलीय. षटकाची सुरुवातच वाईडने झाली. त्यानंतर इशानने सलग तीन चौकार मारले. त्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर एक षटकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर आणखी एक चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता.

अशाप्रकारे त्याने ६ चेंडूत एकूण २९ धावा ठोकल्या होत्या. ज्यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या महागड्या षटकाने इश सोधीचा लाजिरवाणा विक्रमही झाला. टी२० मध्ये न्यूझीलंडने टाकलेला हा दुसरा सर्वात महागडा षटक होतं. मालिकेच्या मागील सामन्यात इश सोधीने आधीच एकदा एका षटकात २९ धावा दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी काय म्हणाले?

अस्थिविसर्जनानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; दिवसभरात राजकीय चक्रे कशी फिरली?

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'अजितदादांच्या विचारांचा वारसा...'

राज्यात पवार नावाचं वलय कायम ठेवायचं असेल तर..., सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मनोज जरांगेंचं मोठं विधान

कामाला जायची घाई नडली, तरुणी जीवाला मुकली; काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ

SCROLL FOR NEXT