IND VS NZ T20 SERIES | INDIA CLINCHES SERIES 4-1 saamtv
Sports

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

India vs New Zealand T20: तिरुअनंतपुरममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ४६ धावांनी विजय मिळवत भारताने न्यूझीलंडवर ४-१ असा दमदार विजय मिळवला. इशान किशन आणि अर्शदीप सिंग यांनी संपूर्ण चमकदार कामगिरी केली.

Bharat Jadhav

  • अंतिम टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने मालिका ४-१ ने खिशात घातली.

  • तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर भारताचा दमदार विजय झालाय.

  • अर्शदीप सिंगची ५ विकेट घेतल्या.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरम झाला. येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेलेल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला.

भारतीय संघाने ४६ धावांनी अखेरचा पाचवा सामना जिंकलाय. या सामन्यात आधी किवीच्या गोलंदाजांची इशान किशनने धुलाई केली, त्यानंतर किवीच्या फलंदाज भारतीय गोलंदाजांचा भेदक माऱ्यापुढे चीत झाले. आधी दोन षटकात सपाटून मार खाल्यानंतर अर्शदीप सिंग आपल्या भेदक माऱ्यानं न्युझीलंडच्या खेळाडूंना नाकीनऊ आणलंय. एका नंतर एक विकेट घेत अर्शदीप सिंगनं ५ खेळांडून तंबूचा रस्ता दाखवला.

या विजयासह भारताने टी२० पाच सामन्यांची ही मालिका ४-१ अशी जिंकलीय. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशनचे शतक आणि सूर्याच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १९.४ षटकांत २२५ धावांवर गारद झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने पाच विकेट घेतल्या. या विजयासह भारताने टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली.

भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. फिन ऍलनने ३८ चेंडूत ८० धावा केल्या. रचिन रवींद्रनेही १७ चेंडूत ३० धावा जोडल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अर्शदीप सिंगने पाच, अक्षर पटेलने तीन आणि वरुण चक्रवर्तीने एक बळी घेतला. ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ १९.४ षटकांत २२५ धावांवर गारद झाला

भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली पण ते ४२ धावांवर दोघेही बाद झाले. त्यानंतर इशान किशनने जोरदार फलंदाजी केली आणि आपले शतक पूर्ण केले, त्याने फक्त ४३ चेंडूत १०३ धावा केल्या, आत ६ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमार यादवनेही कर्णधाराची खेळी खेळली, त्याने ३० चेंडूत ६३ धावा केल्या. हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान, न्यूझीलंडचे गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT