Sports

India vs New Zealand T20 Final: संजू, अभिषेक आणि दुबेची वादळी खेळी; न्युझीलंडसमोर २५६ धावांचे आव्हान

T20 World Cup Final: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध दमदार फलंदाजी केली. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी भारताला २५५ धावांचा मोठा डोंगर उभा करण्यास मदत केली आणि न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले.

Bharat Jadhav

प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनीही स्थिर सुरुवात दिली. भारतीय सलामीवीरांनी विक्रमी कामगिरी करत किवींच्या खेळाडूंचा घाम फोडला. अभिषेक शर्मा सुरुवातीपासूनच खूपच धाडसी आणि आक्रमक दिसत होता आणि त्याने फक्त १८ चेंडूत जलद अर्धशतक ठोकून पॉवरप्लेमध्ये भारताचा स्कोअर ९२ धावांवर नेला. त्यांच्या विकेटनंतर शिवम दुबेने किवींची धुलाई केली . अखेरच्या षटकात त्याने २४ धावा ठोकत भारताची धावसंख्या २५५ वर पोहोचवली.

विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक

भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची बॅट पूर्ण विश्वचषकात शांत राहिली. पण आज त्याने शानदार कामगिरी केली. त्याला अखेरच्या सामन्यात वगळण्यात येईल असं वाटत होतं परंतु संघाने त्याच्यावर विश्वास ठेवत संघात स्थान दिलं. तो विश्वास सार्थ ठरवत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावून त्याने इतिहास रचला. अभिषेकने फक्त १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. एकूणच, त्याने त्याच्या खेळीदरम्यान सहा चौकार आणि तीन षटकार मारले. या डावात त्याचा फलंदाजीचा स्ट्राईक रेट २४७.९० होता.

संजूचं तिसरं अर्धशतक

अभिषेक व्यतिरिक्त संजू सॅमसननेही सलग तीन अर्धशतके झळकावून इतिहास रचला. त्याने सुपर ८ आणि सेमीफायनलनंतर आज पुन्हा अंतिम फेरीत अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन हा असा पराक्रम करणारा क्रिकेट जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. ही ऐतिहासिक खेळी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाणार आहे. अहमदाबादमध्ये त्याच्या बॅटमधून खेळलेली ही संस्मरणीय खेळी क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: पार्टीत 'नव्या' मिस्ट्री मॅनसोबत दिसली मलाइका अरोरा; रोमँटिक फोटोमुळे चर्चांना उधाण

Nashik : नाशिकमध्ये सर्वात मोठा भूखंड घोटाळा उघड, ४९ बिल्डर कचाट्यात सापडले, वाचा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीत सिंग याची चौकशी करू नका, शरद पवार पक्षाची मागणी

Central Bank Jobs: १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Thin Hair Care Tips: पातळ केस दाट होण्यासाठी काय उपाय करायचे?

SCROLL FOR NEXT