rohit sharma saam tv
क्रीडा

Rohit Sharma Record: NZ विरूद्ध अवघ्या इतक्या धावा करताच हिटमॅन रचणार इतिहास!मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूंना सोडणार मागे

Most Runs International Cricket: या सामन्यात रोहित शर्माला मोठा विक्रम रचण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Record:

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये धर्मशाळेच्या मैदानावर हाय व्हॉल्टेज सामना रंगणार आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी ४-४ सामने खेळले आहेत.

हे चारही सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना सोडला तर उर्वरीत तिन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडला आहे. दरम्यान न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात ९३ धावा करताच रोहित शर्माच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत त्याने आतापर्यंत २६५ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने १३१ धावांची तुफानी खेळी केली होती.

त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यातही त्याची बॅट चांगलीच तळपली होती. या सामन्यात त्याने ८६ धावांची खेळी केली होती. तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने ४८ धावा केल्या होत्या.

रोहित शर्माचा फॉर्म पाहता तो न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात मोठी खेळी करू शकतो. या सामन्यात ९३ धावांचा आकडा गाठताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावा पूर्ण करणार आहे. असा कारनामा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे. रोहितने आतापर्यंत ४५५ सामन्यांमध्ये १७,९०७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४५ शतके आणि ९८ अर्धशतकं झळकावली आहेत.

असा कारनामा करणारा ठरणार चौथा भारतीय फलंदाज..

भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत ३४,३५७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १०० शतकं आणि १६४ अर्धशतकं झळकावली आहेत.

तर विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. विराटने ५६७ सामन्यांमध्ये २६,०२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७८ शतकं आणि १३४ अर्धशतकं झळकावली आहेत.

भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीतील ५०९ सामन्यांमध्ये २४,२०८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४८ शतकं आणि १४८ अर्धशतकं झळकावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज..

सचिन तेंडुलकर- ३४,३५७ धावा

विराट कोहली- २६,०२६ धावा

राहुल द्रविड - २४,२०८ धावा

रोहित शर्मा - १७,९०७ धावा*

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT