ishant sharma ravindra jadeja ajinkya rahane
ishant sharma ravindra jadeja ajinkya rahane 
क्रीडा | IPL

रहाणे, इशांत, जडेजा संघातून बाहेर; १२ वाजता सामना सुरु हाेणार

साम न्यूज नेटवर्क

मुंबई ajinkya rahane latet news : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (शुक्रवार) येथील वानखेडे स्टेडियमवर थाेड्याच वेळेत सुरू होईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघास तीन मोठे झटके बसले आहेत. संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा ishant sharma , अष्टपैलू रवींद्र जडेजा ravindra jadeja आणि पहिला कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे ajinkya rahane यांचा दुखापतींमुळे संघात समावेश झालेला नाही.

कानपूर येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे डाव्या हाताच्या बोटास दुखापत झाली हाेती. या कसाेटीत अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. स्कॅन केल्यानंतर, त्याच्या हातावर सूज असल्याचे निदान झाले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. याबराेबरच क्षेत्ररक्षण करताना कर्णधार अजिंक्य रहाणेस डाव्या हाताच्या दुखापतीचे दुखणे वाढले हाेते. तो पूर्णपणे बरा झालेला नाही.

त्यामुळे अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा या तिन्ही खेळाडूंना आजच्या मुंबईतील दुसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. या तिन्ही खेळाडूंच्या वैद्यकीय बाबींवर आणि प्रगतीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवणार आहे असे बीसीसीआयने (bcci) स्पष्ट केले आहे.

दरम्यान आजचा सामन्याची नाणेफेक ११.३० वाजता हाेईल. त्यानंतर सामना दुपारी १२ वाजता सुरु हाेईल. आज ७८ षटकांचा खेळ हाेईल असेल बीसीसीआयने काही वेळापुर्वी ट्विट करुन जाहीर केले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT