IND vs NZ
IND vs NZ Saam Tv
क्रीडा | IPL

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना रद्द; जोरदार पावसामुळे निर्णय

साम टिव्ही ब्युरो

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टनमधील पहिला T20 सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही, त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील चार-पाच तास पाऊस थांबण्याची शक्यता नाही. (Cricket News)

त्यामुळे निर्धारित वेळेपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. कट ऑफ वेळ 02:16 होती. सामन्याची नाणेफेक सकाळी 11.30 वाजता होणार होती, ती होऊ शकली नाही. हा सामना दुपारी 12 वाजता सुरू होणार होता, पण तोही होऊ शकला नाही. दोन्ही कर्णधारांनी सामना रद्द करण्याचे मान्य केले. (Latest Marathi News)

आता भारत आणि न्यूझीलंडचे संघ 20 नोव्हेंबरला मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात आमनेसामने येतील. हा सामना माऊंट मॉनगानुई येथे होणार आहे. तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबरला नेपियरमध्ये खेळवला जाईल. यानंतर 25 नोव्हेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल.

पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल.

स्टार फलंदाज विराट कोहली, अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांच्यासह कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल या मालिकेला दिसणार नाहीत. हार्दिक पांड्या  (Hardik Pandya)  तीन सामन्यांच्या T20I मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. यानंतर वनडेची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे.


भारत-न्यूझीलंड T20 आणि ODI मालिकेचे वेळापत्रक

>> पहिली T20: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता (पावसामुळे रद्द)

>> दुसरी T20: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता

>> तिसरी टी-20: 22 नोव्हेंबर 202, दुपारी 12 वाजता

>> पहिला एकदिवसीय सामना : 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7

>> दुसरा एकदिवसीय सामना : 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7

>> तिसरा एकदिवसीय : 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7 वाजता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT